नवी दिल्ली : भारतावर सध्या दहशतवादाचे सावट घोंघावत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी टाळण्यासाठी विमानतळ, रेल्वे स्थानक, मेट्रो स्थानक, बस स्थानक आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी रासायनिक हल्ला करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच सर्वत्र हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेने केंद्र सरकारने १ सप्टेंबरला एक पत्रक जारी केले होते. 


कडक सुरक्षा व्यवस्था


दहशतवादी हल्ल्यासाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा अन्य सामानांचा वापर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विमान, मेट्रो, रेल्वे किंवा अन्य वाहतुकीच्या माध्यमांमध्ये या वस्तूचा वापर करून रासायनिक हल्ला करण्याच्या तयारीत दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी, विमानतळ, रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.