Photographer Found His Model After 32 Years: मुंबई, ही एक मायानगरी आहे. ही एक स्वप्ननगरी (Mumbai City of Dreams) आहे. या शहरानं अनेकांची स्वप्न पुर्ण केली आहे. 90 च्या दशकातील मुंबई तुम्हाला आठवत असेल तर गरीबापासून ते श्रीमंतांपर्यंत या मायानगरीत (Photographer Dario Mitidieri Viral Post)अनेकांच्या नानाविध कहाण्या असतील. काहींच्या रोमहर्षक तर काहींच्या हृदयद्रावक... परंतु अशाही काही कहाण्या असतात त्या ऐकून, वाचून आपल्यासमोर आपलेच आय़ुष्य उभे आहे हे काय असेच वाटते. त्या काळी इतकी भन्नाट माणसं होऊन गेली क आज त्यांच्याबद्दल (Savita Girl on The Pole) परत ऐकलं की आपल्यालाही फार आनंद होतो. इतकी सकारात्मक आणि प्रसन्न माणसं आज असती तर किती मजा आली असती नाही, अशीत एक रंजक कहाणी आहे ती ऐकून तुम्हाला अशीच काहीशी अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. 


'तो' फोटो व्हायरल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या गिल्लीमध्ये (Mumbai) अशीच एक लहानगी मुलगी होती जिचं नावं होतं सविता. एका लांब खांब्यावर उभी राहतानाचा तिचा एक फोटो एका सुप्रसिद्ध इटालियन फोटोग्राफरनं काढला होता. ती त्या काळी खांबवर लटकून आपलं पोट भरत होती. आता हीच मुलगी खूप मोठी (Savita Viral News) झाली आहे, आणि त्याच मुलीचा फोटो तिचा 32 वर्षांपुर्वी काढलेल्या त्या फोटोग्राफरनं शेअर केला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होतो आहे. या फोटोखाली त्या फोटोग्राफरनं एक भावूक संदेशही लिहिला आहे. 


कुठे आहे सविता? 


त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,  सविता आजही अगदी सामान्य जीवन जगते. ती मुंबई हेअर क्लिप्स विकते. त्यांचे जीवन हे अद्यापही फार कठीण आहे आम्हाला भेटण्यासाठी तिनं सुट्टी घेतली. महिंद्रा शिंदे हा त्यांच्या त्यावेळेचा एक जुना मित्र त्यांच्यासोबत आहे. आम्ही आता एकत्र डिनरला बसलो आहोत. या फोटोग्राफरनं यावेळी मुंबईतील माणसांचे आणि त्यांच्या जीवनाचे खूप कौतुक केले आहे त्यांच्याबद्दल खूप चांगले उद्गार काढले आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या मुलीचा आणि सविता एक फोटो आणि सविता जुना व आत्ताचा एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टवर अनेक चांगल्या कमेंट्स येत आहेत.



'स्ट्रीट चिल्ड्रेन ऑफ बॉम्बे' या एका प्रोजेक्टसाठी इटलीचे प्रसिद्ध छायाचित्रकार डारियो मिडिएरी यांनी हा फोटो 1992 मध्ये काढला होतो. त्यांची मुलगी मारा ही आशियाच्या दौऱ्यावर आहे तेव्हा सवितानं तिचं स्वागत केले, असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.