#YogaAtHome: जगभरात आज साजरा होतोय आंतरराष्ट्रीय योग दिन
योगासने करा, तंदुरूस्त राहा
मुंबई : भारतासह जगभरात रविवारी सहावा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज घरात राहूनच योह दिन साजरा केला जात आहे. योग दिनच्या निमित्ताने योग करायला सुरूवात करा आणि कोरोना व्हायरसपासून स्वतःला लांब ठेवा. योग हाच स्वस्थ आरोग्याचा पासवर्ड आहे.
आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. शारीरिक आणि मानसिक रूपाने स्वस्थ होण्यासाठी योग साधनेची अत्यंत गरज आहे.
जगभरात साजरा होतोय योग उत्सव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी ६.३० वाजता करणार मार्गदर्शन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून आल्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. आजचे सहावे वर्ष आहे जेव्हा योग दिन साजरा केला जात आहे.
हरिद्वारमध्ये योगगुरू बाबा रामदेव यांचा योगासनांचा कार्यक्रम होत आहे.