जागतिक योगा दिन : पंतप्रधानांच्या उपस्थितीत हजारो नागरिकांचा योगाभ्यास
आज चौथ्या जागतिक योगदिनानिमित्त देशभरात पहाटेपासूनच हजारो नागरिक योगाभ्यासाठी एकत्र आले आहेत.
मुंबई : आज चौथ्या जागतिक योगदिनानिमित्त देशभरात पहाटेपासूनच हजारो नागरिक योगाभ्यासाठी एकत्र आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उत्तराखंडात डेहराडूनमध्ये प्रमुख कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. तिकडे राजस्थानातल्या कोटा शहरात बाबा रामदेवांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास सुरू आहे. इथे महाराष्ट्रात मुबंईमध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री यांनी योगदिनानिमित्त आयोजित योगसानांच्या कार्यक्रमात हजेरी लावली आहेत. याशिवाय जगातल्या विविध देशांमध्ये आज जागतिक योग दिनाच्या निमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.