नवी दिल्ली: जगभरातील इंटरनेट सेवा येत्या ४८ तासांसाठी ठप्प होण्याची शक्यता आहे. मुख्य डोमेन सर्व्हरची येत्या काही तासांसाठी दैनंदिन देखभाल-दुरूस्तीसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे ही परिस्थिती ओढवणार असल्याचे वृत्त 'रशिया टुडे'ने दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वृत्तानुसार, इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाइन्ड नेम्स अॅन्ड नंबर्स (आयसीएएनएन)  या दरम्यान क्रिप्टोग्राफिक की बदलून यदेखभाल-दुरूस्तीचे काम करणार आहे. या बदलांमुळे डोमेन नेम सिस्टीमची सुरक्षा आणखी वाढणार आहे. जेणेकरून भविष्यात इंटरनेट सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित राहील. 


यामुळे येत्या काही तासांसाठी इंटरनेट युजर्सला नेटवर्क फेल्युअरच्या त्रासाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे इंटरनेट युजर्सला येत्या ४८ तासांच्या दरम्यान वेबपेज अॅक्सेस करणे किंवा एखादा व्यवहार करण्यासाठी अडचणी येऊ शकतात.