श्रीनगर: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानाच्या परिसरात शनिवारी एका तरुणाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. या तरुणाने गाडीने प्रवेशद्वारावरील बॅरिकेटस्  उडवून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी केलेल्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा आत्मघाती हल्ल्याचा प्रकार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, काहीवेळातच हा तरुण स्थानिक रहिवाशी असल्याची माहिती समोर आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तरुणाचे नाव मुरफस शहा असून तो घरातून जिमला जाण्यासाठी निघाल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. तो काल रात्री माझ्यासोबत होता. तो नेहमीप्रमाणे जिमला जात होता. त्याची कार आतमध्ये शिरली असेल तरी सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले का नाही?


त्याला ठार मारण्याची काय गरज होती, असा सवाल त्यांनी विचारला. या घटनेनंतर तरुणाच्या संतप्त नातेवाईकांनी फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी या सर्वांना प्रवेशद्वारावरच अडवले.