पत्नीच्या नावावर या सरकारी योजनेत करा गुंतवणूक, मिळेल ५० लाखांचा सपोर्ट
जर तुम्ही फ्युचर प्लानिंगबाबत विचार करत असाल तर ही बातमी आहे तुमच्या कामाची. सध्या हल्ली अनेक गुंतवणुकीच्या ठिकाणी होत असलेल्या फसवणुकीमुळे कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवताना लोक चार वेळा विचार करतात.
मुंबई : जर तुम्ही फ्युचर प्लानिंगबाबत विचार करत असाल तर ही बातमी आहे तुमच्या कामाची. सध्या हल्ली अनेक गुंतवणुकीच्या ठिकाणी होत असलेल्या फसवणुकीमुळे कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवताना लोक चार वेळा विचार करतात. जर तुमची पत्नी हाऊसवाईफ आहे अथवा नोकरी करते तर दोन्ही स्थितीमध्ये तुम्ही पत्नीच्या नावाने पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड(ppf) अकाऊंट उघडू शकता. पीपीएफ अकाऊंटमधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो.
यातील रिटर्न्सही गँरटेड असतात. त्यामुळे यात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा पर्याय उत्तम आहे.
१५ वर्षात तुम्ही व्हाल ५० लाखांचे मालक
तुम्ही तुमच्या पत्नीच्या पीपीएफ अकाऊंटमध्ये अधिकाधिक १.५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करु शकता. जर तुम्ही इतकीच रक्कम दरवर्षी पत्नीच्या नावावर पीपीएफ अकाऊंटमध्ये जमा करत असाल तर १५ वर्षानंतर हा फंड मॅच्युअर होऊन तुम्हाला तब्बल ५० लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकतो. म्हणजेच गरज पडल्यास तुम्ही तुमच्या पत्नीकडून ५० लाखापर्यंतचा सपोर्ट मिळवू शकता.
७.८ टक्के रिटर्न्स
सध्या पीपीएफ अकाऊंटवर वर्षाला ७.८ टक्के रिटर्न्स मिळतायत. या हिशोबाने पीपीएफ अकाऊंटमध्ये तुम्ही १५ वर्षापर्यंत दरवर्षाला १.५ लाख रुपये जमा करत असाल तर व्याजदराच्या हिशोबाने तुमचे ४३ लाख रुपये जमा होतात. सरकारकडून पीपीएफ स्कीमवरील व्याजदराची दर तीन महिन्यांनी समीक्षा केली जाते.
कमीत कमी ५०० ते दीड लाख रुपये
येणाऱ्या काळात पीपीएफच्या व्याजदरात कपातही होऊ शकते अथवा वाढही शकते. व्याजदरात वाढ झाल्यास तुम्ही पीपीएफ अकाऊंटमध्ये १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करुन ५० लाख रुपये मिळवू शकता. पीपीएफ अकाऊंटचा नियम आहे की यात तुम्हाला दरवर्षाला १.५ लाखाहून अधिक रक्कम जमा करता येणार नाही.
ही आहे अट
दुसरी अट अशी की तुम्ही जॉईंट अकाऊंट खोलू शकत नाही. तुम्ही यात स्वत:, पत्नीच्या नावावर अथवा मुलाच्या नावाने अकाऊंट खोलू शकता. हे खाते सुरु करण्यासाठी तुम्ही कमीत कमी ५०० रुपये वर्षाला तर अधिकाधिकक दीड लाख रुपये गुंतवू शकता.
टॅक्स नाही
दरम्यान, पीपीएफ अकाऊंटमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यातील जमा रकमेवरील मिळणाऱे व्याज टॅक्स फ्री असते. याचा अर्थ अकाऊंट मॅच्युअर झाल्यानंतर जी रक्कम मिळेल त्यावर तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार नाही.