मुंबई : कमी काळात जास्त फायदा प्रत्येकाला हवा असतो. बँकेत तुम्ही आम्ही ठराविक रक्कम जमा करतो. पण बँकेकडून मिळणारा व्याजदर फारच कमी असतो. तुम्हाला जर वर्षभरात बँकेपेक्षा अधिक व्याजदर आणि इतर फायदे हवे असतील, तर तुम्ही पोस्ट ऑफीसच्या या खास योजनेत गुंतवणूक करु शकता. पोस्ट ऑफीस फिक्स डिपॉझीट (Post office fixed deposit) असं या योजनेचं नाव आहे. विशेष म्हणजे या योजनेत गुंतवणूक केल्यास दमदार व्याजासह इतरही फायदे मिळणार आहेत. गुंतवणूकदाराला आर्थिक फायद्यासह सरकारी हमीही मिळेल. या योजनेत तिमाहीवर आधारित व्याजाची (Post Office FD Interest Rate 2021)  सुविधा मिळते. (Invest in the fixed deposit scheme of the Post Office get more profit than bank in 1 year Know all the details)
  
या योजनेबाबतची सविस्तर माहिती ही भारतीय पोस्टच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. दिलेल्या माहितीनुसार गुंतवणूकदार या योजनेत 1,2, 3 आणि 5 वर्षांसाठी एफडी (FD) करु शकतो. या योजनेत गुंतवणूक करण्याचे इतर फायदे काय आहेत, हे जाणून घेऊयात.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाणून घ्या फायदे.....


पोस्ट ऑफीसात एफडी केल्यास केंद्र सरकार सुरक्षिततेची हमी देते. गुंतवणूकदाराने गुंतवलेली पूर्ण रक्कम ही सुरक्षित असते. या योजनेत गुंतवणूकदार हा ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतीने व्यवहार करु शकतो. गुंतवणूकदार 1 पेक्षा अधिक एफडीमध्ये गुंतवणूक करु शकतो. ही एफडी बँकेतील खात्याला लिंकही करता येते. एफडीचा कालावधी 5 वर्षांचा निवडला असले, तर गुंतवणूकदाराला आयटीआर फाईल करताना कर सवलत मिळेल. तसेच सोयीनुसार एका पोस्ट ऑफीसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफीसमध्ये सहजपणे ट्रान्सफर करता येऊ शकतं. 


पोस्टात एफडी सुरु करण्यासाठी आधी खातं उघडावं लागेल. चेक किंवा कॅश स्वरुपात रक्कम जमा करुन खातं उघडता येईल. किमान 1 हजार ते जास्तीत जास्त कितीही रक्कम जमा करुन खातं उघडता येईल.   


एफडीवर व्याज किती मिळणार? 


या योजनेत 7 दिवसांपासून ते वर्षभराच्या कालावधीसाठी एफडीवर 5.50 टक्के व्याज मिळेल. हाच व्याज दर 2 आणि 3 वर्षांच्या कालावधीसाठीही आहे. तर 3 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी एफडी ठेवल्यास त्यावर 6.70 इतका व्याज मिळेल.