नवी दिल्ली - आगामी वर्षात तुम्हाला जर कमी जोखीम असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करून जास्तीत जास्त फायदा हवा असेल, तर तुमच्यासाठी मुदत ठेवी (फिक्स्ड डिपॉझिट) हा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. खासगी कंपन्या आणि बॅंका या दोन्ही ठिकाणी मुदत ठेवीत गुंतवणूक करता येते. अर्थात बॅंकांपेक्षा खासगी कंपन्यांमधील मुदत ठेवींमधील गुंतवणुकीवर जास्त मोबदला मिळू शकतो. तिथे जोखीमही जास्त असते. पण फायदा जास्त हवा असेल, तर कंपनीची पूर्ण माहिती घेऊन आणि तिच्या भविष्यातील योजना तपासून तुम्ही खासगी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपन्यांकडून मुदत ठेवींवर ९.२५ टक्के व्याज
कंपन्यांमधील मुदत ठेवींवर सध्या पाच वर्षांसाठी ९.२५ टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे. जर ज्येष्ठ नागरिकांच्या नावाने मुदत ठेवी करण्यात येत असतील. तरत त्यासाठी आणखी पाव टक्का व्याजदर मिळत असेल. म्हणजे हे व्याजदर पाच वर्षांसाठी ९.५० टक्क्यांवर जाऊन पोहोचेल. 


खासगी कंपन्यांमध्ये मुदत ठेव ठेवण्यापू्र्वी...
कंपन्यांमध्ये मुदत ठेवी ठेवल्यावर व्याजदर जास्त मिळत असले, तरी त्यामध्ये जोखीमही जास्त असते. त्यामुळे मुदत ठेव ठेवण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक असते. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांचे रेटिंग नक्कीच पाहा. रेटिंगच्या माध्यमातून कळू शकते की तुमची गुंतवणूक किती सुरक्षित आहे. ज्या कंपन्यांचे काही रेटिंग नसते किंवा ज्याचे रेटिंग कमी असते. शक्यतो त्याच कंपन्या जास्त व्याजदर देण्याची तयारी दर्शवितात. त्यामुळे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणे आवश्यक असते.