या दिवाळीत येथे पैसे गुंतवा, FD पेक्षाही जास्त रिटर्न्स मिळण्याची शक्यता
असा विश्वास आहे की, बाजारात सुधारक टप्पा येईल जो चांगला असेल.
मुंबई : तुम्हाला जर लाँग टर्म गुंतवणूक करायची असेल आणि तुम्हाला चांगला परतावा देखील हवा असेल, तर तुम्ही अशा काही शेअर्समध्ये पैसे गुंतवू शकता ज्या कंपनीच्या शेअर्सची सध्याची किंमत जरी कमी असली तरी पुढे जाऊन तुम्हाला त्यातुन जास्त परतावा मिळू शकतो. ब्रोकिंग कंपनी शेअरखानने इक्विटी मार्केटबद्दल आपली सकारात्मक भावना कायम ठेवली आहे आणि असा विश्वास आहे की, बाजारात सुधारक टप्पा येईल जो चांगला असेल. तसेच त्यांनी अशा 15 शेअर्सची नावे दिली आहेत, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता, कारण भविष्यातील मागणी लक्षात घेता या शेअर्सचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
APL अपोलो ट्यूब्स
मजबूत ग्रोथ आउटलुक, 30 टक्के उच्च RoE, मजबूत बॅलेंस शीट आणि उत्कृष्ट मॉडेलने APL Apollo Tubes ला सर्वोत्तम बनवलं आहे.
बलरामपूर चिनी मिल्स
साखर उद्योगातील चांगल्या क्षमतेचा ही कंपनी मुख्य लाभार्थ्यांपैकी एक असेल. डिस्टिलर्सचे जास्त योगदान मार्जिन सुधारण्यास मदत करेल. FY2024 पर्यंत कंपनीचे परताव्याचे प्रमाण 20 टक्क्यांहून अधिक होण्याची अपेक्षा आहे.
Divis लेबोरेटरीज
2021 ते 2023 या आर्थिक वर्षांमध्ये Divis प्रयोगशाळांच्या विक्री आणि PAT (करानंतरचा नफा) 24 टक्के आणि 30 टक्के CAGR देणे अपेक्षित आहे. परंतु या कंपनीच्या जोखमींबद्दल बोलायचे झाले तर, फॉरेक्स हालचालीमुळे कमाईच्या वाढीवर काही नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो.
ICICI बँक
रिटेल, CV आणि वैयक्तिक कर्ज विभागांमध्ये व्यवसाय गती वाढण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे कॉर्पोरेट कर्ज विभागात, बँक चांगले रेटिंग असलेल्या कंपन्यांना टार्गेट करत असल्यामुळे येथे जास्त रिटर्न्स येण्याची शक्यता जास्त आहे.
ISGEC हेवी अभियांत्रिकी
अलीकडे ऑर्डरचे बुकिंग वाढले आहे, त्यामुळे महसूल अधिक चांगला होण्याची अपेक्षा आहे. ऑर्डर इनटेक दृष्टीकोन सकारात्मक आहे, पायाभूत सुविधांवर सरकारचा भर आणि खाजगी कॅपेक्सचे पुनरुज्जीवन यामुळे कंपनीला मदत झाली. ज्यामुळे भविष्यात रिटर्न्सची चांगली संधी आहे. परंतु याच्या जोखमीबद्दल बोलायचे झाले तर, लोअर ऑर्डर बुकमध्ये महसूल घटला आहे, जो धोका असू शकतो.
ITC
FY22 मध्ये कंपनीची कोर सिगारेट विक्री 12 ते 13 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. गतिशीलता सुधारल्यामुळे आणि सिगारेटवरील करात कोणतीही वाढ न केल्याने, सिगारेटची विक्री चांगली गतीने वाढण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे ग्राहांना याच्या शेअर्समध्ये फायदा होईल.
लार्सन अँड टुब्रो
महसूल आणि ऑर्डर प्रवाह या दोन्हींवर लक्ष केंद्रित करून, स्थानिक बाजारपेठेत रिकव्हरीची मॅनेजमेंटला अपेक्षा आहे. कोरोनाची दुसरी लाट असूनही, ऑर्डरची शक्यता 8.96 लाख कोटींवर आहे, जी चांगली मानली जात आहे.
LIC हाऊसिंग फायनान्स
मोठ्या जागेची अधिक मागणी आणि अधिक परवडणारे असल्याने कंपनीला उत्तम गृहकर्ज वितरणाचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, चांगल्या ECL कव्हरेजसह अधिक फायदे मिळतील.
NOCIL
रबर रासायनिक किंमतींमध्ये सुधारणा आणि क्षमता वाढल्यामुळे मार्जिन 715 बेसिस पॉइंट्सने वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे तुम्ही येथे लाँग टर्मसाठी पैसे इनव्हेस्ट करु शकता.
PVR
कोरोनामुळे मागिल 2 वर्षांपासून अनेक सिनेमे रिलिज केले गेलेले नाही, ज्यामुळे येत्याकाळात थांबलेले सिनेमे स्क्रिनवर येणार आहेत, ज्यामुळे जास्त फायदा कंपनीला होऊ शकतो.
Radico खेतान
प्रभावी वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट आणि उत्तम नफा यामुळे कंपनीला येत्या काही वर्षांत अधिक मोफत रोख प्रवाह निर्माण होण्यास मदत होईल. अधिक रोख रक्कम प्रिमियम ब्रँड विकसित करण्यात मदत करेल, ज्यामुळे तुम्ही यात गुंतवणूक करु शकता
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मालमत्तेचा दर्जा, भांडवलीकरणाच्या बाबतीत उत्तम स्थितीत आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या सहामाहीपासून मालमत्तेची गुणवत्ता सुधारेल अशी अपेक्षा आहे.
Tata Elxsi
येत्या काही वर्षांत कंपनीची वाढ मजबूत राहण्याची अपेक्षा आहे. कारण ते उच्च विकास क्षेत्रे आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणार आहे.
टाटा मोटर्स DVR
या कंपनीची कमाई आणि वाढ चांगली होण्याची अपेक्षा आहे.
टायटन कंपनी
मॉल्स सुरू झाल्याने, चांगली हालचाल आणि नवीन उत्पादने सुरू झाल्याने व्यवसायात सुधारणा होईल. त्यामुळे ग्राहक या शेअर्समध्ये देखील आपले पैसे गुंतवू शकतात.