पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! 50 रुपये जमा करा मिळतील 35 लाख; अधिक जाणून घ्या
Gram Suraksha Scheme: पोस्ट ऑफिसची एक जबरदस्त योजना आहे. या योजनेमुळे तुम्ही धनवान व्हाल. याबाबत अधिक जाणून घ्या.
मुंबई : Gram Suraksha Scheme: तुम्हालाही सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत. यामध्ये गुंतवणुकी संबंधित कोणताही जोखीम राहत नाही. पोस्ट ऑफिसची एक जबरदस्त योजना आहे. (Post Office Scheme) या योजनेमुळे तुम्ही धनवान व्हाल. दररोज तुम्ही 50 रुपये जमा करत राहिल्यास मुदतीनंतर तुम्हाला 35 लाख रुपये मिळतील. याबाबत अधिक जाणून घ्या.
आज प्रचंड महागाईला तोंड द्यावे लागत आहे. गुंतवणूक करताना प्रत्येकामध्ये जोखीम घेण्याची क्षमता नसते. अशा परिस्थितीत तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करावी जिथे तुमचे पैसे सुरक्षित असतील आणि तुम्हाला शून्य जोखमीसह चांगला परतावा मिळेल. तुम्हालाही अशी गुंतवणूक हवी असेल, जिथे चांगला नफाही मिळत असेल, तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी चांगली आहे.
35 लाख रुपये मिळतील
पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात. यामध्ये रिस्क फॅक्टरही कमी आहे आणि त्याचवेळी रिटर्नही (परतावा) चांगला मिळतो. पोस्ट ऑफिसची 'ग्राम सुरक्षा योजना' गुंतवणुकीसाठी चांगली आहे. ज्यामध्ये तुम्ही कमी जोखमीसह चांगला परतावा मिळवू शकता. या योजनेत तुम्हाला दरमहा 1500 रुपये जमा करावे लागतील. ही रक्कम नियमितपणे जमा केल्यास आगामी काळात तुम्हाला 31 ते 35 लाखांचा फायदा होईल.
गुंतवणूक करण्याचे काही नियम जाणून घ्या
- 19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
- या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
- या प्लानचे प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक केले जाऊ शकते.
- प्रीमियम भरण्यासाठी तुम्हाला 30 दिवसांची सूट मिळते.
- या योजनेवर तुम्ही कर्जही घेऊ शकता.
- ही योजना घेतल्यानंतर 3 वर्षांनी तुम्ही ते सरेंडरही करु शकता. परंतु या स्थितीत तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही.
तुम्हाला असा फायदा होईल
समजा, एखाद्या व्यक्तीने वयाच्या 19 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली, तर त्याचा 55 वर्षांसाठीचा मासिक हप्ता 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. अशा परिस्थितीत, पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल.