LICच्या या पॉलिसीत एकदाच पैसे जमा करा, दरमहा 20 हजार रुपये पेन्शन मिळवा
या योजनेत इतरही अनेक फायदे आहेत. जेथे तुम्ही गुंतवणूक करताच पॉलिसी जारी केली जाते.
मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या विमा योजना ऑफर करते. ज्यामुळे ग्राहकांना चांगला फायदा तर मिळेलच, तसेच आणि बरेच बनिफीट्स देखील आहेत. LIC ची अशीच एक पॉलिसी जीवन अक्षय आहे, ज्यामध्ये जर ग्राहकांनी एकरकमी पैसे जमा केले तर, त्यांना आजीवन पेन्शन मिळते. या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पॉलिसी घेताना पॉलिसीधारकाला संपूर्ण आयुष्यासाठी किती पेन्शन मिळेल याची माहित मिळते.
एलआयसीच्या जीवन अक्षय योजनेत तुम्ही स्वत:साठी किंवा कुटुंबातील सदस्यासाठी गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही वार्षिक, सहामाही, त्रिमासिक किंवा दर महिन्याला पेन्शन घेऊ शकता.
या योजनेत इतरही अनेक फायदे आहेत. जेथे तुम्ही गुंतवणूक करताच पॉलिसी जारी केली जाते, तीन महिन्यांनंतर तुम्ही कर्ज सुविधेचा लाभ देखील घेऊ शकता. या योजनेत गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही.
पॉलिसी काय?
ही एकल प्रीमियम नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपिंग आणि वैयक्तिक वार्षिकी पॉलिसी आहे. यामध्ये किमान 1 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही 1 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला वार्षिक 12 हजार रुपये पेन्शन मिळेल.
३५ ते ८५ वयोगटातील लोक ही पॉलिसी घेऊ शकतात. कुटुंबातील कोणतेही दोन सदस्य संयुक्त वार्षिकी घेऊ शकतात. पेन्शन मिळवण्यासाठी 10 विविध पर्याय आहेत.
20 हजार रुपयांच्या पेन्शनसाठी एवढी गुंतवणूक करावी लागेल
LIC च्या जीवन अक्षय-VII पॉलिसीमध्ये एकूण 10 पर्याय असतील. एक पर्याय आहे ज्यामध्ये तुम्हाला एका प्रीमियमवर दरमहा 20 हजार रुपये पेन्शन मिळते. तुम्हाला ही पेन्शन दर महिन्याला हवी असेल, तर तुम्हाला दरमहा पेन्शनचा पर्याय निवडावा लागेल. गणनेनुसार, दरमहा 20 हजार 000 रुपये पेन्शन मिळविण्यासाठी, तुम्हाला एकावेळी 40 लाख 72 हजार रुपये गुंतवावे लागतील. ज्यामुळे तुमचे मासिक पेन्शन 20 हजार 967 रुपये असेल.
तुम्हाला आवश्यक असलेल्या पेन्शनच्या रकमेनुसार दिलेल्या पर्यायांमधून रक्कम निवडा आणि त्या आधारावर तुम्हाला गुंतवायची असलेली रक्कम गुंतवा.