Post Office Scheme :  कोणत्याही गुंतवणुकीशी जोखीम असते. तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करा जिथे तुमचे पैसे सुरक्षित असतील आणि कमी जोखमीसह चांगले परतावा मिळेल. इक्विटी मार्केटमध्ये जोखीम जास्त असते. त्यामुळे इतर गुंतवणूक उत्पादनांपेक्षा परतावा देखील जास्त असतो. पण प्रत्येकामध्ये जोखीम घेण्याची क्षमता नसते. अशा परिस्थितीत तुम्हाला अशी गुंतवणूक हवी असेल जिथे चांगला नफाही मिळेल, तर पोस्ट ऑफिसच्या (Post Office ) योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. (investment post office scheme invest only 10 thousand rupees and give 16 lakh rupees know detalis)
 
पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना सर्वोत्तम पर्याय आहेत. यामध्ये रिस्क फॅक्टरही कमी आहे. त्याच वेळी रिटर्नही चांगला मिळतो. एक अशी गुंतवणूक सांगतो ज्यात जोखीम नगण्य आहे. तसेच परतावाही चांगला असतो. पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव हा त्यापैकी एक गुंतवणुकीचा (Post Office Recurring Deposit) मार्ग आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट खाते ही चांगली व्याजदरासह लहान हप्ते जमा करण्यासाठी एक सरकारी हमी योजना आहे.  यामध्ये तुम्ही फक्त 100 रुपयांच्या छोट्या रकमेसह गुंतवणूक सुरू करू शकता. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.
 
या योजनचं खातं 5 वर्षांसाठी उघडलं जातं. बँका 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षांसाठी आवर्ती ठेव खात्याची सुविधा देतात. जमा केलेल्या पैशावर दर तिमाहीत (वार्षिक दराने) व्याज मोजले जाते. ते प्रत्येक तिमाहीच्या शेवटी तुमच्या खात्यात (चक्रवाढ व्याजासह) जोडलं जातं.


व्याज किती मिळणार?


आवर्ती ठेव योजनेवर 5.8% व्याज उपलब्ध आहे. हा नवीन दर 1 एप्रिल 2020 करण्यात आला आहे. केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीत आपल्या सर्व लहान बचत योजनांचे व्याजदर निश्चित करते.


दरमहा 10 हजार आणि मिळणार 16 लाख रुपये


पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले, तर 10 वर्षांनंतर तुम्हाला 5.8% दराने 16 लाखांपेक्षा जास्त पैसे मिळतील.
 
मासिक गुंतवणूक - 10 हजार रुपये  
व्याज - 5.8 टक्के
मॅच्योरिटी - 10 वर्ष
10 वर्षानंतर मिळणारी एकूण रक्कम - 16 लाख 28 हजार 963 रुपये


आरडी (RD) खात्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी


नियमितपणे खात्यात पैसे जमा करत रहावे लागेल. पैसे जमा केले नाहीत तर गुंतवणूकदाराला दरमहा 1 टक्का दंड भरावा लागेल. 4 हफ्ते चुकल्यानंतर तुमचे खाते बंद केलं जातं.