Investment Stratergy: देशभरात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या 4 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. दरम्यान देशभरातील विविध मीडिया हाऊसने आपला एक्झिट पोल जाहीर केलाय. झी न्यूजच्या झिनीया या एआय अॅंकरनेदेखील एक्झिट पोल दिला. दरवेळेस लोकसभा निकालानंतर बाजारात मोठी तेजी किंवा मंदी येण्याची शक्यता  असते. त्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष नेहमी एक्झिट पोलकडे असते.
यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार तिसऱ्यांदा मोदी सरकारच्या पुनरागमनाचा अंदाज लावला जात आहे. जर असे घडले तर काही थीम आणि क्षेत्रे बाजारात फोकस होतील. याचा बाजारावरही परिणाम झालेला दिसेल. यावेळी विशिष्ट थीम आणि सेक्टर फोकसमध्ये राहतील. तसेच बाजार आजदेखील नवे रेकॉर्ड बनवू शकतो. अशावेळी तुमची इन्व्हेस्टमेंट स्टॅटर्जी काय असायला हवी? निफ्टी-बँक निफ्टीवर तुम्ही कोणत्या लेव्हलकडे लक्ष ठेवायला हवे?  गुंतवणूकदार, ट्रेडर्सने कशी गुंतवणूक करायला हवी? यावर मार्केट गुरु अनिल सिंघवी यांनी स्ट्रॅटर्जी सांगितली आहे. याबद्दल जाणून घेऊया. 


EXIT POLL नंतर गुंतवणूकदारांनी काय करावे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुंतवणूकदारांनी पुढील 3 ते 5 वर्षांचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून पैसे गुंतवा. एकाच दिवशी सगळा पैसा गुंतवू नका. निकालानंतर घसरण होत असेल तर थोडी रोकड तुमच्याकडे असू द्या, असा सल्ला सिंघवी यांनी दिला आहे.  चांगल्या दर्जाच्या मिड-स्मॉलकॅप समभागांमध्ये पैसे गुंतवणे चांगले. यासोबतत PSU, रेल्वे, पॉवर, डिफेन्स, एनर्जी, टेलिकॉम, मॅन्युफॅक्चरिंग, FMCG, मार्केट इन्फ्रा शेअर्सवर तुम्हाला लक्ष ठेवता येईल. 


EXIT POLL नंतर व्यापाऱ्यांनी काय करावे?


गॅप-अप ओपनिंगनंतर प्रॉफिट बुकींग आल्यास आधी सपोर्ट लेव्हलवर खरेदी करायला हवे. फक्त आज खरेदी करणे आणि उद्या विकणे धोकादायक असू शकते, असेही सांगण्यात आलंय. 


जर NDA ला EXIT POLL नुसार 370 जागा मिळाल्या तर निफ्टीचे लक्ष्य 23400-23500 असेल. उद्या एनडीएने 400 पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर निफ्टीचे लक्ष्य 24000-24500 असेल.
एनडीएच्या जागा 325 च्या आसपास आल्यास, निफ्टीचे लक्ष्य 22 हजार 800 ते 23 हजार असेल असेही सांगण्यात आलंय. 


जूनची सुरुवात जोरदार होण्याची चिन्हे आहेत. EXIT POLL मधून मजबूत ट्रेंड समोर येतायत. ग्रेट GDP आकडेवारी, जीएसटी संकलनात जोरदार वाढ, डावो 575 अंकांनी वाढला, FII ची मोठी छोटी स्थिती, इंडेक्स लॉंग केवळ 14%, सिरिजच्या पहिल्या दिवशी रोख आणि स्टॉक फ्युचर्समध्ये FII कडून जोरदार खरेदी, देशांतर्गत निधीनेही मालिकेच्या पहिल्या दिवशी `2100 कोटींची चांगली खरेदी केली, कच्च्या तेलात कमकुवतपणा, सिरिजच्या सुरुवातीला व्यापारी आणि गुंतवणूकदारांकडून हलकी पोझिशन या गोष्टींकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.