LICची कमाल स्कीम! 121 रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा 27 लाख; मुलीच्या लग्नाचे नो टेन्शन
LIC Best Scheme: तुम्हालाही मुलीच्या भविष्याची चिंता आहे का? तर काळजी करु नका. एलआयसीच्या या पॉलिसीमुळं तुम्हाला मुलीच्या शिक्षणासह लग्नाचीही चिंता करण्याची गरज नाही.
LIC Best Scheme: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत वेगवेगळ्या योजना जाहिर करत असतात. ज्यामुळं गुंतवणुक करणे सोप्पे जाते. मुलींसाठी एलआयसीने मुलींसाठीदेखील काही योजना आणल्या आहेत. ज्यात मुलींच्या शिक्षणापासून ते अभ्यासापर्यंतचे टेन्शन घ्यायची तुम्हाला आता गरज पडणार नाही. मुलीच्या वडिलांना तिच्या शिक्षणाबरोबरच तिच्या लग्नाची चिंताही सतावत असते. आता जरी काळ बदललेला असला तरी अजूनही काही ठिकाणी ही परिस्थिती आहेच. हेच लक्षात घेऊन एलआयसीने कन्यादान पॉलिसी आणली आहे. या पॉलिसीअंतर्गंत मुलीच्या लग्नापर्यंत पैशांची चिंता सतावणार नाही. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
मुलीच्या लग्नासाठी 27 लाखांचा फंड
LIC Kanyadan Police ना फक्त मुलीचे भविष्यच सुरक्षित करते तर त्यांच्या लग्नाच्या पैशातून तुम्हाला टेन्शन फ्रीदेखील करते. या योजनेच्या नावाप्रमाणेच मुलीचे वय लग्नाचे झाले की मोठ्या प्रमाणात फंड निर्माण करते. या योजनेअंतर्गंत तुम्हाला रोज 121 रुपये जमा करावे लागणार आहेत. म्हणजेच या हिशोबाने प्रत्येक महिन्याला 3,600 रुपये जमा करावे लागणार आहेत. या गुंतवणुकीनंतर पॉलीसी मॅच्युअर झाल्यानंतर म्हणजेच 25 वर्षांनंतर तुम्हाला एकहाती 27 लाख रुपये मिळणार आहेत.
स्कीमचा मॅच्युरिटी पिरीयड
एलआयसीच्या या पॉलिसीचा मॅच्युरिटी पीरियड 13 आणि 25 वर्षांपर्यंत आहे. तुम्ही 121च्या ऐवजी दररोज 75 रुपये भरुन म्हणजेच 2250 रुपये महिन्याला भरल्यानंतर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला 14 लाख रुपयांची रक्कम मिळू शकते. तुम्ही या पॉलिसीअंतर्गंत किती रक्कम भरायची ती कमी-जास्त करु शकता. त्यानुसार तुम्हाला म्यॅचुरिटीनंतर मिळणारी रक्कम कमी-जास्त होणार आहे.
कर सवलत
मुलींसाठी बनवलेल्या या प्लानमध्ये वयाबाबतही काही बंधने आहेत. या स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्या वडिलांचे वय कमीत कमी 30 वर्ष असायला हवे. तर मुलीचे वय 1 वर्ष इतके असायला हवे. मोठी रक्कम फंड झाल्यानंतर LIC Plan मध्ये इतर टॅक्स बॅनिफिट्सदेखील मिळतात. एलआयसी कन्यादान पॉलिसी इनकम टॅक्स अॅक्ट 1961 च्या सेक्शन 80 सीच्या अंतर्गंत येते. त्यामुळं प्रिमीयम जमा करणाऱ्यांना 1.5 लाखापर्यंतची करसवलत मिळते.
इतकंच नव्हे तर, पॉलिसीहोल्डरसोबत मॅच्युरिटीच्या आधीच काही दुर्घटना झाली तर तर अशा स्थितीत कुटुंबातील सदस्यांना 10 लाखापर्यंतची भरपाई आणि कुटुंबीयातील सदस्यांना प्रिमियमदेखील भरावे लागत नाही. पॉलिसी मॅच्युरिटी झाल्यानंतर नॉमिनीला 27 लाख रुपये दिले जातील.
कोणती कागदपत्रे आवश्यक
LIC कन्यादान पॉलिसीसाठी तुम्हाला कोणते कोणते कागदपत्रे लागणार याची माहिती घ्या. आधारकार्ड, ओळखपत्रे, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, पासपोर्ट फोटो, मुलीचे जन्मप्रमाणपत्र