मुंबई : टाटा गृपच्या कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना नेहमीच चांगले रिटर्न देत आहेत. यामध्ये आणखी एका कंपनीचे नाव जोडले गेले आहे. या कंपनीने शेअरधारकांना 1 वर्षात 1100 टक्के परतावा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


TATA Teleservices (Maharashtra) लिमिटेड चा शेअर एका वर्षापूर्वी 9 जून रोजी 3.82 रुपयांवर बंद झाला होता. शुक्रवारी (11  जून) रोजी हा शेअर 46.95 रुपयांवर पोहचला. याप्रकारे या शेअरच्या किंमतींमध्ये 1129 टक्के परतावा मिळाला आहे.



टाटाच्या या मिडकॅप कंपनीमध्ये कोणीही 1 लाख रुपये जरी गुंतवले असतील त्यांना आज 11.29 लाखर रुपये मिळतील.



जर TATA Teleservices ची तुलना इतर टेलिकॉम कंपन्यांशी केली तर, या अवधीमध्ये भारती एअरटेलचे शेअर 6.56 टक्के, तर वोडाफोन आयडीयाचे शेअर्स 5.23 टक्क्यांनी घसरले आहेत. तसेच रिलायन्स कम्युनिकेशन चे शेअर्स 42.41 टक्क्यांनी वाढले आहेत.