Share Market Fall: आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार कोसळला आहे. बँकिंग, अर्थविषयक आणि आयटी शेअर्समध्ये जबरदस्त घसरण नोंदवण्यात आली आहे. बीएसई सेंसेक्स सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास 1330 अंकांनी म्हणजेच 1.67 टक्क्यांनी घसरुन 78.399 अंकावर स्थिरावला आहे. त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सजेंचचा निफ्टीदेखील 342 अंकांनी म्हणजेच 1.82 टक्क्यांनी घसरुन 23,862 अंकांवर स्थिरावला आहे. या घसरणीनंतर बीएसईवर लिस्टेट सर्व कंपन्यांचे मार्केट कॅप 8.44 लाखांनी कमी होऊन 439.66 लाख कोटींवर पोहोचले आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर तीन टक्क्यांनी घसरले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेअर बाजारातील सर्वाच क्षेत्रांमध्ये घसरण सुरू आहे. बँक, ऑटो, वित्त, आयटी, फार्मा, मेटल, तेल व गॅस कंपन्या या क्षेत्रात 0.5 टक्के ते 1.7 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान होत आहे. रिलायन्सचा शेअर सकाळी 11.40 वाजण्याच्या सुमारास बीएसईवर 3.44 टक्क्यांनी घटून 1292.85 वर स्थिरावला होता. त्याचबरोबर कंपनीचे मार्केट कॅप घटून 17,49,532.83 कोटी रुपये इतकं आहे. 


शेअर बाजारात घसरण का?


- शेअर बाजारात होत असलेल्या घसरणीचे कारण म्हणजे, तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 नोव्हेंबर रोजी अमेरिकत होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमुळं अनिश्चितता आहे. त्यामुळं याचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसला आहे. डेमोक्रेटिक उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रंप यांच्यात लढत होणार आहे. यामुळंच शेअर बाजारात अनिश्चततेचे सावट आहे. त्यामुळं गुंतवणुकदार संभ्रामात आहे. 


- कमला हॅरिस यांच्या विजयामुळे यूएस फेडरल रिझर्व्ह अधिक अनुकूल भूमिका घेऊ शकते. यामुळे आरबीआय पॉलिसी रेट कमी करू शकते. 
  
- दुसऱ्या तिमाहीत कंपन्यांचे उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी झाले होते. त्यामुळं इक्विटीमध्ये घसरण झाली आणि त्यामुळं FIIला भारतीय शेअर्स विकण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. 


- कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने बाजारातील दरांवरही परिणाम झाला आहे. सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात कच्चा तेलाच्या किमती प्रति बॅरल एक डॉलरने वाढल्या आहेत. ओपेक प्लस देशांनी डिसेंबरमध्ये उत्पादन वाढवण्याची योजना एक महिन्याने वाढवण्याची घोषणा केली आहे.