Government Job In IOCL: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने इंजीनियरिंग असिस्टेंट (EA) आणि टेक्निकल अटेंडेंट (TA) पदासाठी रिक्त जागा अधिसूचित केल्या आहेत. पाइपलाइन विभागांतर्गत देशभरात रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. आवश्यक पात्रता असलेले उमेदवार 12 सप्टेंबर 2022 पासून plapps.indianoil.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज सादर करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे. IOCL रिक्त जागा 2022 बद्दल अधिक तपशील जसे की पात्रता, पगार, रिक्त जागा आणि इतर तपशील खाली दिले आहेत.


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    आयओसीएलमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2022

  • आयओसीएल प्रवेशपत्र 2022 तारीख - 27 ऑक्टोबर 2022

  • परीक्षेची तारीख - 06 नोव्हेंबर 2022

  • एसपीपीटीची तारीख - 07 नोव्हेंबर 2022


पात्र उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे. आणि कमाल वयोमर्यादा 26 वर्षे ठेवण्यात आली आहे. अर्ज फीबद्दल बोलायचे झाल्यास, सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी 100 रुपये आहे. SC/ST/PwBD उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि कौशल्य/ प्रवीणता/ शारीरिक चाचणी (SPPT) या आधारे केली जाईल. उमेदवार IOCL पाइपलाइन रिक्रूटमेंट पोर्टल https://plapps.indianoil.in वर अर्ज करू शकतात. IOCL रिक्त पदांची अधिसूचना तपासण्यासाठी थेट लिंक https://iocl.com/admin/img/UploadedFiles/LatestJobOpening/Files/7a171190f1434aa4ae087fce6cd37500.pdf वर पाहू शकता.


व्यावसायिक किंवा उच्च शिक्षण असलेले उमेदवार (अभियांत्रिकी / एमबीए आणि त्याच्या समकक्ष पदवी / पीजीडीएम / एमसीए / एलएलबी / सीए / आयसीडब्ल्यूए / सामाजिक कार्य / पत्रकारिता / एमबीबीएस इ. पदव्युत्तर पदवीधर, आणि इतर कोणतेही पदवीधर) आणि त्यावरील व्यावसायिक पात्रता असलेले उमेदवार अभियांत्रिकी सहाय्यक पदांसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. वेतन श्रेणी-I मधील तांत्रिक परिचर पदांसाठी उमेदवाराकडे मॅट्रिक/10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच सर्व सेमिस्टर/वर्षांचे गुण दर्शविणारी अंतिम ITI गुणपत्रिका आणि ट्रेड सर्टिफिकेट/नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट आवश्यक आहे.