मुंबई : आयपीएल 2022 सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अजूनही काही संघांचे कर्णधार निश्चित होणं बाकी आहे. किंग कोहलीनं RCB चं कर्णधारपद सोडल्यानंतर पुढचा कर्णधार कोण होणार याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. दिनेश कार्तिकचं नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडे मॅनेटमेंटचे पुन्हा एकदा कोहलीची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

RCB चा नवा कर्णधार कोण होणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार RCB चं कर्णधारपद हे CSK चा माजी आणि धोनीचा भरवशाच्या खेळाडूकडे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. ग्लॅन मॅक्सवेलची देखील सर्वांना प्रतिक्षा आहे. मॅक्सवेल लग्नाच्या गडबडीत असल्याने आयपीएलच्या सुरुवातीचे सामने खेळणार नाही. त्यामुळे त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा देणार की नाही देखील पाहाणं गरजेचं आहे. 


कोहली आणि दिनेश कार्तिक सोडून आता धोनीच्या भरवशाच्या खेळाडूचं नाव समोर येत आहे. RCB च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्णधारपदाची जबाबदारी फाफ ड्यु प्लेसिसकडे दिली जाण्याची शक्यता आहे. 


जर फाफ ड्यु प्लेसिसकडे संघाचं कर्णधारपद गेलं तर दिनेश कार्तिक आणि विराट कोहलीला देखील त्याचं म्हणणं मानावं लागणार आहे. या बाबत अधिकृत घोषणा होणं अद्याप बाकी असल्याने उत्सुकता वाढली आहे. 


आयपीएल 2022 च्या पंधराव्या हंगामाची सुरुवात 26 मार्चपासून होणार आहे. 70 सामने एकूण 10 टीममध्ये खेळवण्यात येणार आहेत. 15 सामने पुण्यात तर उर्वरित सामने मुंबईतील 3 स्टेडियमवर होणार आहेत. यंदाच्या आयपीएलचं आणखी एक वैशिष्ट्यं आहे की यावेळी टायटल स्पॉन्सर टाटा असणार आहे.