मुंबई ः  तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ( share market ) गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर, हा महिना तुमच्यासाठी अनेक पर्याय घेऊन आला आहे. मार्चमध्ये साधारण  दहा IPO बाजारात येणार आहेत. या IPO मधून  गुंतवणूकदारांना बंपर कमाईची संधी आहे. गेल्या महिन्यात  आलेल्या  IPO (Initial public offer) मधून गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे  मार्चमध्ये लॉन्च होणाऱ्या IPO कडून गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याची अपेक्षा आहे. ( IPO launch news )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्च  महिना अनेक IPO चा महिना असणार आहे. भारतातील प्रसिद्ध  कंपन्या आपल्या IPO च्या लॉन्चिंगच्या तयारीला लागल्या आहेत. या कंपन्यांमध्ये एमटीएआर टेक्नोलॉजी (MTAR Technologies), कल्याण ज्वेलर्स (Kalyan Jewellers), पावर ग्रिड (Power Grid InvIT), अनुपम रसायण (Anupam Rasayan), लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज (Laxmi Organic ), Barbeque Nation Hospitality आणि आधार हाउसिंग फाइनेंस (Aadhar Housing Finance)यांचा  सामावेश आहे


शेअर बाजारातील तरलता आणि चांगल्या संकेतांच्या पार्श्वभूमीवर IPO मधून गुंतवणूकदारांना फायदा होण्याची शक्यता आहे. कोणकोणत्या कंपन्यांचे IPO मार्च मध्ये येणार आहेत. त्याबाबत  सविस्तर जाणून घेऊ  या!


एमटीएआर टेक्नोलॉजी (MTAR Technologies)



'एमटीएआर  टेक्नोलॉजीचा IPO सब्सक्रिप्शनसाठी 3 मार्च रोजी खुला झाला आहे. एमटीएआर टेक्नोलॉजीने  597 कोटीचा IPO लॉंन्च केला आहे. ही हैद्राबाद येथील इंजिनियरींग कंपनी आहे. एमटीएआर टेक्नोलॉजी रक्षा आणि अंतरिक्ष क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. राफेल, इस्त्रो आणि डीआरडीओ साठी सुविधा निर्माण  करण्याचे काम या  कंपनीकडून केले जाते. 


ईजीट्रिप प्लानर्स (Easytrip Planners IPO)



ईजीट्रिप प्लानर्स ही ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी आहे. 8 मार्च रोजी ही कंपनी आपला IPO लॉन्च करणार आहे.  10 मार्च रोजी हा IPO बंद होणार  आहे. कंपनीचे या IPO च्या माध्यमांतून 510 कोटी रुपये  मिळवण्याचे लक्ष आहे.


आधार हाउसिंग (Aadhar Housing Finance)



आधार हाउसिंग फायनान्सच्या IPO मध्ये  खासगी इक्विटी फर्म ब्लॅकस्टोनने फंडिंग  केली आहे. आधार फायनान्सने आपल्या IPO तून 7 हजार 300 कोटींचे लक्ष ठेवले आहे. 


कल्याण ज्वेलर्स (Kalyan Jewellers)



कल्याण ज्वेलर्स ही दक्षिण भारतातील प्रसिद्ध ज्वेलर्सपैकी एक कंपनी  आहे.  कंपनीचे IPO तून 1000 कोटी रुपयांचे लक्ष आहे 


पुराणिक बिल्डर्स (Puranik Builders)



पुराणिक बिल्डर्स मुंबईतील प्रसिद्ध विकासक आहेत. IPOच्या माध्यमातून कंपनीचे 810 कोटी रुपये मिळवण्याचे लक्ष आहे. 


बार्बिक्यु नेशन ( Barbeque Nation )



बार्बिक्यु नेशन ही प्रसिद्ध हॉटेलिंग साखळी आहे. 1000 - 1200 कोटी रुपयांचा IPO कंपनी बाजारात आणणार आहे.