मुंबई : कायम म्हटलं जातं, पत्नी हीच घराची बॉस असते. मात्र IPS ऑफिसर अंकुर अग्रवाल (Ankur Aggrawal) यांची पत्नी वृंदा शुक्ला (Vrinda Shukla) ऑफिसमध्ये देखील त्यांची बॉस आहे. अंकुर अग्रवाल आणि वृंदा शुक्ला यांची गोष्ट अगदी फिल्मी आहे. दोघं एकमेकांचे बालपणीचे मित्र, दोघांनी एकत्रच शिक्षण पूर्ण केलं. यानंतर दोघं एकत्रच आयपीएस ऑफिसर झाले आणि 2019 मध्ये लग्न केलं. 


नोएडामध्ये तैनात आहेत वृंदा आणि अंकुर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात कमिश्नर प्रणाली लागू झाल्यानंतर वृंदा शुक्ला यांना पोलिस उपायुक्त म्हणजे DCP बनवण्यात आलं. तर अंकुर अग्रवालला अपर पोलिस उपायुक्त बनवण्यात आलं. 



IANS च्या अहवालानुसार, अंकुर अग्रवाल आणि वृंदा शुक्ला हे हरियाणातील अंबालाचे रहिवासी असून ते एकमेकांचे शेजारी होते. वृंदा आणि अंकुर यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण अंबाला कॉन्व्हेंट जीसस अँड मेरी स्कूलमधून पूर्ण केले. वृंदा पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेली, तर अंकुर भारतात राहिला आणि त्याने अभियांत्रिकीची पदवी घेतली.


शिक्षण पूर्ण केल्यानंतर वृंदा शुक्ला अमेरिकेत नोकरी करू लागली, तर अंकुर अग्रवालने इंजिनीअरिंग केल्यानंतर बंगळुरूमध्ये नोकरी सुरू केली. एक वर्ष बंगलोरमध्ये काम केल्यानंतर, तो अमेरिकेतही गेला आणि नशिबाने दोघांना पुन्हा एकत्र केले.


UPSC ची तयारी अमेरिकेत सुरु 


अंकुर अग्रवाल आणि वृंदा शुक्ला यांनी अमेरिकेत नोकरी करत असताना यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. यानंतर, 2014 मध्ये वृंदाला नागरी सेवा परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. यानंतर ती आयपीएस अधिकारी झाली आणि तिला नागालँड कॅडर मिळाले. दोन वर्षांनंतर, 2016 मध्ये, अंकुरची पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवांमध्ये निवड झाली आणि तो आयपीएस अधिकारी झाला. त्याला बिहार केडर मिळाले.



दोघांनी 2019 मध्ये लग्न केले


वृंदा शुक्ला आणि अंकुर अग्रवाल यांची बालपणीची मैत्री प्रेमात बदलली. आयपीएस झाल्यानंतर, दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि फेब्रुवारी 2019 मध्ये लग्न केले.