एका महिन्यात तिसऱ्यांदा IRCTC ची वेबसाइट ठप्प; तात्काळ तिकीट बुक करताना अडचणी
Tatkal Ticket Bookings: आयआरसीटीची वेबसाइट पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. त्यामुळं प्रवाशांना तिकिट बुक करण्यास अडचणी येत आहेत.
Tatkal Ticket Bookings: इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशन (IRCTC) चे अॅप आणि वेबसाइट पुन्हा एकदा ठप्प झाले आहेत. डिसेंबर महिन्यात तिसऱ्यांदा आयआरसीटीसीमध्ये तांत्रिक समस्या आल्याने अॅप आणि वेबसाईट ठप्प झाली आहे. तात्काळ तिकिट बुकिंग करायच्या आधीच वेबसाइट ठप्प झाली आहे. तिन्ही वेळाला सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारासच वेबसाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. तर 10 वाजल्यापासून तात्काळ तिकिट बुक करण्याची वेळ आहे. तात्काळ तिकिट बुक करतानाच वेबसाइटवर जास्त लोड आल्याने तांत्रिक समस्या निर्माण होतात.
आयआरसीटीसी वेबसाइटवर लॉगिन करण्यास समस्या आल्यानंतर युजर्सना साइटवर एक मेसेज आला होता. 'पुढील एक तासासाठी संपूर्ण वेबसाइटवर बुकिंग आणि कॅन्सल करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही. गैरसोयीबद्दल क्षमस्व. कॅन्सलेशन आणि TDR नोंदणी करण्यासाठी कृपया कृपया कस्टमर केअर नंबर 14646, 08044647999 किंवा 08035734999 किंवा etickets@irctc.co.in वर ईमेल करा.
तांत्रिक समस्येमुळं ट्रेनचे तिकिट बुक करताना प्रवाशांना अडचणी येत आहे. युजर्सने सोशल मीडियावर याबाबत तक्रार केली आहे. Downdetector च्या मते, सुमारे 47% युजर्सना वेबसाइटवर लॉगिन करता आलं नाही. तर 42% लोकांना ॲपमध्ये लॉगइन करताना अडचणींचा सामना करावा लागला आणि 10% तिकीट बुकिंग प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत.
तात्काळ तिकिट बुकिंग करताना अडचणी
डाउंडिटक्टेरच्या आकड्यांनुसार, सकाळी जवळपास 10 वाजल्यापासून साइटवर तांत्रिक समस्या येत आहेत. वेबसाइटवर लॉगिन करता येत नाहीये. त्यामुळं ट्रेनचे वेळापत्रक आणि तिकीटाच्या माहिती शोधण्यास अडचणी येत आहेत. सकाळी साधारण 9.48 वाजण्याच्या सुमारापर्यंत कोणतीही वेबसाइट सुरळीत सुरू होती. आयआरसीटीच्या वेबसाइटवर मेसेज आला होता की एक तासात वेबसाइट पुन्हा पुर्ववत होईल. मात्र तरीही तात्काळ तिकिट बुक करण्यासाठी प्रयत्न करणार्या युजर्सना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला.