IRCTC Goa Package :  गोव्याला फिरायला जाता यावं यासाठी सामान्य लोकांची तळमळ पाहायला मिळते. अनेकदा बजेट नसल्यामुळे गोवा फिरणे अशक्य होते. तर काही वेळेस कामातून सुट्टी न मिळाल्यामुळे देखील गोवा फिरता येत नाही.  जर तुम्ही सुट्ट्यांमध्ये गोवा फिरायला जायायचा प्लॅन करत आहात तर IRCTC ने खिशाला परवडणारं असं भन्नाट पॅकेज आणलं आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबीय किंवा मित्रमंडळींसोबत गोवा फिरायला जाऊ शकता. सामान्य लोकांकरिता IRCTC नं स्वस्त गोवा टूर पॅकेज सुरु केलं आहे. (IRCTC Goa Package Lets Goa IRCTC brings you amazing Goa packages nz)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Goa Tour Package : 
 'गोवा डिलाइट' हे IRCTC च्या हे गोवा पॅकेजचे नाव आहे. या पॅकेजमध्ये उत्तर गोवा, दक्षिण गोवा फिरायला मिळेल. ही टूर 24 नोव्हेंबर 2022 रोजी हैदराबादपासून सुरू होईल आणि तुम्हाला अनेक ठिकाणे फिरता येतील. या पॅकेजमध्ये तीन रात्री आणि चार दिवसांचं आहे. 


गोवा टूर पॅकेजची वैशिष्ट्ये
या पॅकेजमध्ये तुम्हाला प्रवासासाठी फ्लाईटची सोय असेल. राहण्यासाठी 3 स्टार हॉटेलची सुविधा असेल. तसेच, फिरण्यासाठी एसी वाहनाची सुविधा देखील पॅकेजमध्ये देण्यात आली आहे. 


तुम्हाला गोवा ट्रिपमध्ये एकट्याने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला या पॅकेजसाठी 27,330 रुपये मोजावे लागतील. तर दोन लोकांसाठी हे प‌ॅकेज प्रति व्यक्ती 21,455 रुपये दराने हे पॅकेज उपलब्ध असेल. तीन जणांसाठी IRCTC चे गोवा टूर पॅकेज प्रत्येकी 20,980 रुपयांना उपलब्ध असेल. 


कसे बुक करावे?
तुम्हाला आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन बुकिंग करावी लागेल. IRCTCच्या वेबसाईटवर तुम्हाला या पॅकेजची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.