मुंबई : स्टेशनवरील लांबलचक रांगा टाळण्यासाठी बहुतेक लोक IRCTC वेबसाइटवरून रेल्वे तिकीट बुक करणे पसंत करतात. यामुळे लोकांचा वेळ तर वाचतोच, तसेच त्रास देखील कमी होते, ऑनलाईन तिकीट तुम्ही कधीही, कुठेही आणि केव्हा ही काढू शकता. परंतु बऱ्याचदा असे होते की, आपल्याला ज्या दिवशी प्रवास करायचा असेल, त्या दिवशीचे रिजर्वेशन मिळणे कठीण होते. विशेषत: जेव्हा सण-सुदीच्या काळात किंवा सिजनला ही समस्या जास्त पाहायला मिळते. अशा परिस्थितीत तुम्ही प्रवासाच्या तारखेच्या एक दिवस आधी तत्काळ तिकीट बुक करू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

AC कोचसाठी तत्काळ आरक्षण सकाळी 10 वाजता सुरू होते. त्याच वेळी, नॉन-एसी डब्यांचे बुकिंग सकाळी 11 वाजता सुरू होते. पण झटपट आरक्षण मिळणे इतके सोपे नाही. कारण फार कमी सीटसाठी हजारो लोक एकाच वेळी एकत्र प्रयत्न करतात. बर्‍याच वेळा तुम्ही प्रवासाचे तपशील टाकता आणि तिकिटे संपतात आणि तुमची निराशा होते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशी एक युक्ती सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही तत्काळ तिकिटे सहज मिळवू शकाल.


तिकीट बुक करताना, प्रवाशाचा तपशील टाकण्यासाठी जास्तीत जास्त वेळ लागतो. एकापेक्षा जास्त प्रवासी असतील तर आणखी वेळ लागतो. याशिवाय, जेव्हा तुम्ही वेबसाइटवरून तिकीट बुक करता तेव्हा तुम्हाला कॅप्चा कोड देखील टाकावा लागतो. त्यामुळे बुकिंगला बराच वेळ लागतो. हे सर्व केल्याने अनेक वेळा तिकिटे संपतात आणि तुम्हाला वेटिंग लिस्टेड तिकीट मिळते.


अशा परिस्थितीत, आयआरसीटीसी वेबसाइट आणि अॅप तुम्हाला प्रवाशांचे तपशील आगाऊ सेव्ह करण्याचा पर्याय देतात. अशा परिस्थितीत, येथे तुम्हाला प्रवाशांचे तपशील पुन्हा पुन्हा देण्याची गरज नाही. तुम्ही प्रवाशांचे तपशील अगोदर सेव्ह करावेत. असे केल्याने तुमचा वेळ वाचेल आणि तुम्ही तत्काळ तिकिटे लवकरच बुक करू शकाल.


तुमची ट्रेन आणि क्लास निवडल्यानंतर, जेव्हा अॅप किंवा वेबसाइट तुम्हाला प्रवासी तपशील विचारेल, तेव्हा Add New वर क्लिक करण्याऐवजी, Existing वर क्लिक करा. येथे सेव्ह केलेले पॅसेंजर प्रोफाइल तुमच्या समोर येईल. तुम्ही ज्यांच्यासाठी तिकीट बुक करू इच्छिता ते लोक निवडा.


यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता टाकावा लागेल आणि पेमेंट मोडवर जावे लागेल. तेथे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI द्वारे त्वरित पेमेंट करा. तुमचे तिकीट लगेच बुक केले जाईल.