SBI, ICICI सह या बॅंकांच्या कार्डने रेल्वे तिकीट बुकिंग करणं अशक्य
आयआरसीटीसीने एसबीआय, आयआसीआयसीआय समवेत काही प्रमुख बॅंकांच्या डेबिट कार्डने तिकीट बुकिंगची सोय ब्लॉक केली आहे.
मुंबई : आयआरसीटीसीने एसबीआय, आयआसीआयसीआय समवेत काही प्रमुख बॅंकांच्या डेबिट कार्डने तिकीट बुकिंगची सोय ब्लॉक केली आहे.
बॅंक आणि आयआरटीसीमध्ये सुविधा शुल्कावरून काही मतभेद झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
इंडियन ओवरसीज बॅंक, कॅनरा बॅंक, यूनाइटेड बॅंक ऑफ इंडिया, इंडियन बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, एचडीएफसी बॅंक आणि अॅक्सिस बॅंक च्या ग्राहकांना मात्र त्यांच्या कार्डचा वापर करून ऑनलाईन बुकिंग करणं शक्य आहे.
आयआरसीटीसी आणि बॅंक यांनी सुविधा शुल्क निम्मे वाटून घ्यावे असा नियम होता. पण इंडियन बॅंक असोशिएशन आणि आयआरटीसीमध्ये याविषयी सकारात्मक चर्चा न झाल्याने प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे.
ऑनलाईन पेमेंटमध्ये ज्यांच्या कार्डमधून पेमेंट होते त्यातील मर्चंट व्यवहारातील एक हिस्सा बॅंकांना देतात. पण आयआरसीटीसीने असे करण्यास नकार दिला. परिणामी सहा बॅंकांना बुकिंग प्रोसेसमध्ये ब्लॉक केले आहे.