IRCTC Travel package : भारतीय रेल्वेच्या (Indian railway) वतीनं कायमच देशातील विविध वर्गांच्या गरजा लक्षात घेत काही गोष्टींची आखणी करण्यात आली. देशातील सर्वसामान्यांपासून आर्थिक स्थैर्य असणआऱ्यांसाठीही रेल्वे विभागाकडून सातत्यानं काही Tour packages तयार केले जातात. असंच एक पॅकेज रेल्वेकडून तयार करण्यात आलं आहे. जे तुम्हाला देशातील विविध ठिकाणांना भेट देण्याची संधी देईल. 


आईवडिलांसह फिरण्याची संधी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरामध्ये सहसा आईबाबांना किंवा मोठ्या व्यक्तींना एखाद्या छानशा धार्मिक स्थळी नेण्याचा विचार तुम्ही करत असाल तर ही माहिती वाचा. कारण, रेल्वे विभाग तुम्हाला देतंय वैष्णो देवी, हरिद्वार, मथुरा आणि अमृतसर फिरण्याची संधी. बरं, इथं फक्त तुम्ही बसल्या जागी तिकीट बुक केल्यानंतर सहलीदरम्यान राहण्याची, खाण्यापिण्याची चिंताच मिटली म्हणून समजा. कारण, सहलीच्या एकूण खर्चात ही सोय असून, त्याची व्यवस्था रेल्वे विभागाकडूनच केली जात आहे. 


हेसुद्धा वाचा : दैनंदिन जीवनातील 'या' सवयी करतायत शरीर पोखरण्याचं काम; आताच सोडा नाहीतर.... 


 


आयआरसीटीसीच्या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला ऋषिकेशमधील हर की पौडी, हरिद्वार ही ठिकाणं फिरण्यासोबतच गंगा आरती अनुभवण्याची संधी मिळणार आहे. तिथं जम्मूतील कटरा येथे असणाऱ्या माता वैष्णो देवी धामचंही दर्शन तुम्ही घेऊ शकणार आहात. सहलीला चार चाँद लावून जाईल ती अमृतसरची भेट. जिथं तुम्हाला अटारी बॉर्डरला जाण्याची संधी मिळेल. तर, मथुरेतील कृष्ण जन्मभूमी आणि वृंदावनातही फेरफटका मारत कृष्णभक्तीत तल्लिन होण्याची संधी तुम्हाला इथं मिळणार आहे. 


सहलीचा कालावधी  


IRCTC ची ही सहल 28 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. 9 दिवस आणि 8 रात्री इतक्या कालावधीसाठी असणाऱ्या या सहलीसाठीची तिकीट तुम्ही पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रोड, वापी, सूरत आणि वडोदरा या ठिकाणांहून काढता येणार आहे. 


प्रवासासाठी माणसी खर्च किती? 


फिरायचं म्हटलं की हाती पैसे हवेतच. आयआरसीटीसीच्या या सहलीला तुम्हीही जायचा बेत आखत असाल आणि स्लीपर क्लासनं प्रवास करायचा असल्यास तुम्हाला 15300 रुपये खर्च करावे लागणार आहेत. कंम्फर्ट क्लास म्हणजेच 3 AC मधून प्रवास करण्यासाठी तुम्हाला माणसी 27200 रुपये इतका खर्च येईल. डीलक्स अर्थात  2nd AC साठी तुम्हाला माणसी 32900 रुपये इतके पैसे भरावे लागतील. 


काय मग, कसा वाटतोय रेल्वेचा हा बेत? सविस्तर माहितीसाठी तुम्ही आयआरसीटीसीच्या संतेकस्थळ किंवा अॅपचीही मदत घेऊ शकता.