नवी दिल्ली : प्रवासादरम्यान आपल्या घराबाबत, चोरी होण्याबाबत अनेकदा चिंता असते. पण आता भारतीय रेल्वेचा एक अनोखा उपक्रम ही चिंता दूर करणार आहे. ट्रेनमधून प्रवास करत आहात आणि घरी चोरी झाल्यास, भारतीय रेल्वे १ लाख रुपयांपर्यंतचा विमा देणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे प्रवासादरम्यान घरात चोरी झाल्यास आयआरसीटीसी (IRCTC) याची भरपाई देणार आहे. यासाठी प्रवाशांकडून कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येणार नाही. प्रवाशांना ही सुविधा पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे.


काय आहे योजना -


ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान चोरी झाल्यास आयआरसीटीसी (IRCTC) १ लाख रुपयांचा विमा देणार आहे. ही सुविधा निशुल्क आहे. या विम्यासाठी कोणताही प्रीमियम द्यावा लागणार नाही. ही सुविधा सध्या लखनऊ - दिल्ली तेजस एक्सप्रेस ट्रेनच्या प्रवाशांसाठी आहे. 


या ट्रेनमधून प्रवास करताना, घरात चोरी झाल्यास एफआयआर दाखल करावी लागेल. तपासात योग्य आढळल्यास IRCTC विम्याची रक्कम देणार आहे. या सुविधेसाठी IRCTCने Liberty general insurance company limited सह करार केला आहे. 


भविष्यात IRCTC आपल्या आगामी खासगी ट्रेनमध्ये अशीच सुविधा देण्याची योजना आखत आहे. जानेवारी २०२०  मध्ये आयआरसीटीसीकडून मुंबई-अहमदाबाद मार्गावर पुढील तेजस ट्रेन चालवण्यात येणार आहे.


रेल्वेची ही अनोखी सुविधा सध्या तेजस एक्सप्रेससाठी लागू करण्यात आली आहे. दिल्ली-लखनऊ दरम्यान चालवण्यात येणारी तेजस एक्सप्रेस, प्रवाशांच्या सुविधांपासून ते सुरक्षिततेपर्यंतच्या प्रमाणात खास आहे. IRCTCचा दावा आहे की, ट्रेनमध्ये चोरीच्या घटना होण्याची शक्यता नाही. तेजस ट्रेनमध्ये अॅटोमॅटिक दरवाजे आहेत, त्यामुळे कोणतीही अज्ञात व्यक्ती चढण्याची शक्यता कमी आहे. सोबतच संपूर्ण ट्रेनमध्ये खाजगी सुरक्षा रक्षकही तैनात आहेत. ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेराही लावण्यात आला आहे. लखनऊ-दिल्ली तेजस एक्सप्रेस देशातील पहिली कॉर्पोरेट ट्रेन आहे.