मुंबई : आता रेल्वेमध्ये तुमच्या आवडीच्या जेवणाचा आस्वाद  तुम्हाला घेता येणार आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ई-कॅटरिंग सेवा पुन्हा एकदा सुरू केली आहे. (IRCTC's e-catering service resumed) 1 फेब्रुवारीपासून 250 रेल्वेमधील प्रवाशांना ही सुविधा 65 स्टेशनवर मिळत आहे. महाराषट्रातील नागपूर स्टेशनची यासाठी निवड करण्यात आली. प्रवासी ई-कॅटरिंग मोबाइल अँप 'फूड ऑन ट्रॅक' च्या ( Food on Track app) माध्यमातून तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑर्डर करता येणार आहे. (Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) (IRCTC) 1 फेब्रुवारी 2021 रोजी रेल्वेगाड्यांमध्ये प्री-बुकिंग लंच आणि डिनर जेवणासाठी ई-केटरिंग सेवा पुन्हा सुरू केली आहे. कोरोना काळात रेल्वेला ई-केटरिंग सेवा स्थगित कराव्या लागल्या होत्या. देशात कोविड -19चा उद्रेक झाल्यामुळे सुमारे एक वर्ष ई-कॅटरिंग सेवा बंद होती. आयआरसीटीसीने ही सेवा पुन्हा सुरू केली आहे. आयआरसीटीसी वेबसाइट - www.ecatering.irctc.com वर किंवा दूरध्वनीद्वारे  या सेवेचा लाभ घेता येणार आहे. तसेच ‘फूड ऑन ट्रॅक’ अ‍ॅपवर आयआरसीटीसी ई-कॅटरिंग सेवा देखील उपलब्ध आहे. 


कोविड संकटाच्या वेळी भारतीय रेल्वेने बंद केलेली ई-कॅटरिंग सेवा आता 1 फेब्रुवारीपासून निवडक स्थानकांवर पुन्हा सुरू केली आहे. प्रवाशांना अधिक चांगली व प्राधान्य दिली जाणारी ही सेवा असणार आहे. केटरिंग पुरवण्यासाठी सर्व सुरक्षाविषयक नियम पाळत ही सेवा सुरू केली आहे, रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.