मुंबई : मणिपूरमधून अफस्पा हा आर्म्ड फोर्स कायदा रद्द व्हावा याकरिता सलग १३ वर्ष उपोषण करून लढा देणार्‍या इरोम शर्मिला अखेर विवाहबंधनात अडकल्या आहेत.


या लढ्यात त्यांची साथ देणारे डेस्मंड कौटिन्हो यांच्याशी त्या  विवाहबद्ध झाल्या आहेत. हा विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीत पार पडला. 
 
 डेस्मंड कौटिन्हो हे ब्रिटीश असून त्यांनी भारतात हिंदू विवाह कायद्यानुसार लग्न केले. परंतू हा आंतरधर्मीय  विवाह असल्याने त्यांनी विशेष विवाह कायद्यानुसारही आपल्या लग्नाची नोंदणी केली.  त्यानंतर शर्मिलाच्या बोटात अंगठी घालून डेस्मंड कौटिन्हो यांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला. 
 
 लग्नानंतर इरोम शर्मिला आणि डेस्मंड कौटिन्हो कोडाईकॅनालमध्ये स्थायिक होणार आहेत.