हैदराबाद: तेलंगणातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आणि एमआयएम पक्ष आमनेसामने आले आहेत. भाजपकडून नुकताच या निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये राज्यातील कुटुंबांना १ लाख गायींचे वाटप करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच मुद्द्यावरून एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपला धारेवर धरले. भाजपने रोजगाराचे साधन म्हणून राज्यात १ लाख गायींचे वाटप करण्याचे आश्वासन दिले. मात्र, मी त्यांच्याकडे एखादी गाय मागितली, तर ते देतील का? मी त्यांना आश्वासन देतो की गायीचा व्यवस्थित सांभाळ करेन. 


तरीही भाजप माझ्या घरात एखादी गाय देईल का, याबद्दल शंकाच वाटते. ही गोष्ट हसण्यावारी न घेता त्याकडे गंभीरपणे बघितले पाहिजे, असे ओवेसी यांनी सांगितले.