मुंबई : मुकेश अंबानी आणि नीता अंबानींच्या घरी जुळी मुलं ईशा आणि आकाशच्या लग्नाची लगबग सुरु आहे. आकाश अंबानी आणि श्लोका मेहताचं लग्न देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उत्तराखंडमधल्या रुद्रपूरच्या त्रियुगी नारायण मंदिरात होऊ शकतं, अशी माहिती मिळतेय. तर ईशा अंबानीचाही साखरपुडा झाला आहे. यानंतर आता मुकेश अंबानी आणि नीता अंबानींचा छोटा मुलगा अनंतच्या लग्नाचीही चर्चा सुरु झाली आहे. अनंत अंबानीचे काही फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अनंत अंबानीचे राधिका मर्चंटबरोबरचे फोटो समोर आले होते. यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. अंबानी परिवार किंवा मर्चंट परिवारानं याबाबत कोणंतही स्पष्टीकरण दिलेलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशा अंबानीच्या साखरपुड्यामध्ये राधिका सगळ्यात पहिले चर्चेत आली. राधिकानं श्लोका आणि ईशासोबत डान्स केला होता. यानंतर आकाश आणि श्लोकाच्या साखरपुड्यामध्ये शाहरुख खाननं स्टेजवर अनंतला राधिकाच्या नावावरून चिडवलंही होतं. आकाश आणि श्लोकाच्या साखरपुड्यादरम्यान अंबानी कुटुंबासोबत राधिकाला सिद्धीविनायक मंदिरातही पाहिलं गेलं होतं.


कोण आहे राधिका मर्चंट?


राधिका मर्चंट एनकॉर हेल्थकेअरचे सीईओ आणि व्हाईस चेअरमन वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राधिकानं सुरुवातीचं शिक्षण मुंबईमध्येच घेतलं. यानंतर राधिकानं न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीमध्ये पॉलिटिक्स ऍण्ड इकोनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन केलं. न्यूयॉर्कमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर राधिकानं २०१७ पर्यंत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून एका रियल इस्टेट कंपनीमध्ये काम केलं.


मेमध्ये झाली होती साखरपुड्याची चर्चा


अनंत अंबानी आणि राधिकाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मे २०१८ मध्ये या दोघांच्या साखरपुड्याची चर्चा सुरु झाली. पण रिलायन्सच्या प्रवक्त्यांनी ही अफवा असल्याचं सांगतं या चर्चा फेटाळून लावल्या. मुलांकडे वैयक्तिक निर्णय घेण्याची क्षमता आहे. ते स्वत: त्यांचा जीवनसाथी निवडू शकतात, अशी प्रतिक्रिया नीता अंबानींनी बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.