रिलायन्स रिटेलच्या अध्यक्षपदी ईशा अंबानींची निवड? लवकरच होणार अधिकृत घोषणा
रिलायन्स जिओचा व्यवसाय त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीकडे सोपवल्यानंतर आता अनिल अंबानीही रिलायन्स रिटेलबाबतही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत
मुंबई : रिलायन्स जिओचा व्यवसाय त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीकडे सोपवल्यानंतर आता अनिल अंबानीही रिलायन्स रिटेलबाबतही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. लवकरच रिलायन्स रिटेललाही नवीन अध्यक्ष मिळू शकतो.
ईशा अंबानी यांचे नाव चर्चेत
रिलायन्स रिटेलची नवीन चेअरपर्सन दुसरी कोणी नसून मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आहे. मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्यांनुसार, मुकेश अंबानी कधीही ईशाला रिलायन्स रिटेलचे नवे अध्यक्ष म्हणून घोषित करू शकतात.
मंगळवारीच मुकेश अंबानी यांनी त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यांची रिलायन्स जिओच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. जिओ हे रिलायन्सचे टेलिकॉम युनिट आहे. विशेष म्हणजे आकाश आणि ईशा दोघेही रिलायन्स जिओ टीमचा भाग होते.
ईशा अंबानी रिलायन्स रिटेल व्हेंचर्सचे संचालक
सध्या ते रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडमध्ये संचालक आहेत आणि रिटेल व्यवसायाचा विस्तार करण्याची संपूर्ण जबाबदारी ईशा अंबानी यांच्यावर आहे. ईशा अंबानी 30 वर्षांची असून तिने येल विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. ईशा अंबानी आणि आकाश अंबानी हे दोघे जुळी भावंडे आहेत.
27 जून रोजी रिलायन्स जिओच्या बोर्डाची बैठक झाली आणि या बैठकीत आकाश अंबानी यांना कंपनीचे अध्यक्ष बनवण्यास बोर्डाने मान्यता दिली. रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेल या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उपकंपन्या आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 217 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे.