मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीचा साखरपुडा नुकताच आनंद पीरामल यांच्यासोबत पार पड़ला. इटलीमध्ये पार पडलेल्या या साखरपुड्याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. वर्षाच्या शेवटी ईशा अंबानीचा विवाह होणार आहे. लग्न खास पद्धतीने करण्यासाठी ईशा स्वत: जागा ठरवणार आहे. ईशाचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन उदयपूरमध्ये होणार आहे. डिसेंबरमध्ये अंबानी कुटुंबातील मुलीचा विवाह होणार आहे. 


सगळ्यात कमी वयाची बिझनेस वुमन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशियातील 12 सगळ्यात पॉवरफुल बिजनेस वुमनच्या यादीत ईशा अंबानी मागे नाही. ईशा कोणत्याही राजकुमारी पेक्षा कमी नाही. ईशाने खूपच कमी वयात मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलगी म्हणून नाही तर आपल्या मेहनतीच्या जोरावर एक वेगळं स्थान निर्माण केलं. 2015 मध्ये ईशा अंबानीचं नाव फोर्ब्सच्या सर्वात लहान अरबपती बिजनेस वुमनच्या यादीत दुसऱ्या स्थानावर होतं. 2018 मध्ये फोर्ब्सच्या उत्तराधिकारी यांच्या यादीत देखील ईशा दुसऱ्या स्थानी होती.


पीरामल कुटुंबाची होणार सून


ईशा अंबानीने लवकरच पीरामल कुटुंबाची सून होणार आहे. आनंद पीरामलसोबत तिचा विवाह होणार आहे. सध्या ईशा अंबानी रिलायंस इंडस्ट्रीजच्या अनेक महत्त्वाची पदं सांभाळत आहे. ईशा अंबानी दरवर्षी 4710 कोटी रुपयांची कमाई करते. ईशा 16 वर्षाची असतानाच रिलायंस इंडस्ट्रीजमध्ये 80 मिलियन डॉलरची मालकीन होती.


दोन कंपन्यांची डायरेक्टर


ईशा अंबानी एक यशस्वी बिजनेस वुमन आहे. 1991 मध्ये तिचा जन्म झाला असून भाऊ आकाश आणि ती जुळे आहेत.  ईशा रिलायंसच्या टेलीकॉम आणि रिटेल कंपन्यांची डायरेक्टर आहे. ईशाने धीरूभाई इंटरनॅशनल शाळेत शिक्षण घेतलं. यानंतर 2013 मध्ये येल यूनिवर्सिटीमधून तिने सायकोलॉजी आणि एशियन स्टडीजमध्ये ग्रॅज्यूएशन केलं.


16 वर्षात बनली श्रीमंत


ग्रॅज्यूएशननंतर ईशाने अमेरिकाच्या ग्लोबल कन्सलटेंसी फर्म मकिंसेमध्ये काम केलं. येथे तिने बिझनेस अॅनालिस्ट म्हणून काम केलं. यानंतर रिलायंस जिओ आणि रिलायंस रिटेलची ती डायरेक्टर बनली.