Mukesh Ambani Family : देशातीलच नव्हे, तर जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे मुकेश अंबानी. रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा अशी ओळख असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या संपत्तीचा एकूण आकडा 829514 कोटी रुपयांच्या घरात असून, त्यात दिवसागणिक भरच पडत आहे. मुकेश अंबानी हे त्यांच्या उद्योग जगतातील योगदानासोबतच त्यांच्या मोठाल्या कुटुंबामुळंही कायमच लक्ष वेधतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रामध्येही त्यांच्या कुटुंबातील अनेकांनीच प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे. अशा या अंबानी कुटुंबातील एक नाव, फारसं प्रकाशोतात नसलं तरीही हे नाव अशी कामगिरी करतंय ज्यामुळं खुद्द मुकेश अंबानींनाही तिचा सार्थ अभिमान वाटतो. हे नाव आहे, इशिता साळगावकर या तरुणीचं. 


कोण आहे इशिता साळगावकर? 


माध्यमं आणि प्रसिद्धीझोतापासून कायमच दूर राहणाऱ्या दिप्ती साळगावकर यांची ही लेक. अर्थात मुकेश अंबानी यांच्या बहिणीची ही मुलगी, म्हणजेच अंबानींची भाची. दिप्ती आणि दत्तराज साळगावकर यांची मुलगी इशिता व्यवसाय क्षेत्रात सक्रिय असणारी एक नवउद्योजिका आहे. विविध व्यवसाय क्षेत्रांमध्ये ती बरीच सक्रिय आहे. 


अंबानी कुटुंबीयांप्रमाणंच इशितासुद्धा तिच्या वैभवाचा गाजावाजा करत नाही. तिचा साधेपणाच तिच्या स्वभावगुणांना अधोरेखित करतो. Harvard Business School मधून तिनं पदवी शिक्षण घेतलं असून, सध्या ती Salgaocar Corporation Pvt. Ltd. मध्ये Vice President of Corporate Development या पदावर कार्यरत आहे. 


हेसुद्धा वाचा : Mukesh Ambani Sister : भाऊ मुकेश अंबानीच्या मित्राच्या पडली होती प्रेमात, कोण आहे धीरूभाई आणि कोकिलाबेन यांची मुलगी? पाहा Photo


 



इशिता तिच्या आईप्रमाणं समाजसेवी कामांमध्येही सहभागी होताना दिसते. शैक्षणित आणि आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये ती हिरीरिनं सहभागी होत असते. इशिताचा विवाह अतुल्य मित्तलशी झाला असून, तो Nexzu Mobilityचा संस्थापक आहे. Lakshmi Niwas Mittal या प्रसिद्ध आणि धनाढ्या उद्योजकांचा तो पुतण्या. यापूर्वी तिचं लग्न नीरव मोदीचा धाकटा भाऊ नीशाल मोदीशी झालं होतं. पण, 2016 नंतर त्यांचं हे नातं अवघी दोन वर्षे टिकलं आणि या जोडीचा घटस्फोट झाला. ज्यानंतर इशितानं तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली.  अंबानींच्या कुटुंबातील ही उद्योजिका येत्या काळात या क्षेत्रात आणखी कोणती शिखरं गाठते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.