Mukesh Ambani Sister : भाऊ मुकेश अंबानीच्या मित्राच्या पडली होती प्रेमात, कोण आहे धीरूभाई आणि कोकिलाबेन यांची मुलगी? पाहा Photo

Deepti Salgaocar : अनेकांना माहिती नाही की रिलायंस (Reliance) इंडस्ट्रीज संस्थापक धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांना चार मुलं आहेत. कायम चर्चेत मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी असतात. पण त्यांना दोन बहिणीदेखील आहेत. 

Feb 18, 2023, 12:37 PM IST

Mukesh Ambani Sister : मुंबईतील प्रसिद्ध आणि आशियातील सर्वात श्रीमंत रिलायंस (Reliance)इंडस्ट्रीज अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला सर्वसामान्य खूप उत्सुक असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांना मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्याशिवाय अजून दोन मुली आहेत. हो मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांना दोन बहिणीदेखील आहेत. ज्या कायम लाइमलाइटपासून दूर राहतात. नीना आणि दीप्ती असं या दोघींची नावं आहेत.  (mumbai mukesh ambani and Anil Ambani sister deepti salgaocar and Nina Kothari nayantara kothari unseen photo and Who is the daughter of Dhirubhai and Kokilaben)

1/6

दीप्ती साळगावकर

deepti_salgaocar

दीप्ती साळगावकर (deepti salgaocar) हिचं लग्न मुकेश अंबानी यांच्या मित्राशी झालं आहे. राज उर्फ ​​दत्तराज साळगावकर (Dattaraj Salgaonkar)  यांच्याशी प्रेम विवाह झाला आहे. सध्या त्या कुटुंबासह गोव्यात राहतात.   

2/6

इशिताचं लग्न नीरव मोदी यांच्या भावाशी झालं

deepti_salgaocar

राज आणि दीप्ती यांना दोन मुलं आहेत. मुलीचे नाव इशिता आणि मुलाचं नाव विक्रम (Ishita and Vikram) आहे. इशिताचं लग्न नीरव मोदी (Nirav Modi) यांच्या भावासोबत झालं आहे.

3/6

दीप्ती साळगावकर यांच्या मुलीचं लग्न

deepti_salgaocar

दीप्ती साळगावकर यांचं कुटुंब अंबानी कुटुंबाच्या खास कार्यक्रमात दिसतात.

4/6

नीना आणि दीप्ती

nayantara_kothari

तर टीना अंबानी (Tina Ambani) या त्यांच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर या दोघेंचे फोटो कुठल्या ना कुठल्या निमित्ताने शेअर करत असतात. 

5/6

नीना कोठारी

nayantara_kothari

तर धीरूभाई अंबानी यांची मुलगी नीना कोठारी (Nina Kothari) हिचा विवाह 1986 मध्ये भद्रश्याम कोठारीसोबत (Bhadrashyam Kothari) झाला होता. त्यांना एक नयनतारा आणि अर्जुन कोठारी अशी दोन मुलं आहेत. अर्जुन कोठारीचं लग्न आनंदितासोबत झालं आहे. 

6/6

नयनतारा कोठारी

nayantara_kothari

नीना कोठारी यांची मुलगी नयनताराचं (nayantara kothari) लग्न केके बिर्ला (KK Birla) यांचा नातू शमितसोबत झाले आहे.