नवी दिल्ली : एनआयएनं काल देशभरात छापेमारी करुन पकडलेल्या १० दहशतवद्यांचा अयोध्येत रामजन्मभूमीवर हल्ला करण्याचा डाव होता. जाफराबादमध्ये पकडण्यात आलेल्या दहशवाद्यांच्या गटाच्य़ा व्हॉट्स अप ग्रुपमध्ये झालेल्या चॅटवरून ही माहिती मिळलीय. २९ नोव्हेंबरला रामजन्मभूमीवर हल्ला करण्याचा कट तयारही झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनस नावाच्या दहशतवाद्याच्या चॅटमधून ही सनसनाटी माहिती पुढे आलीय. टाईम बॉम्ब बनवण्याचा एक व्हिडिओ देखील एनआयएच्या हाती आलाय. हा व्हिडिओ अटकेत असलेल्या सुहेलच्या घरात चित्रीत करण्यात आल्याचाही एनआयएचा दावा आहे. काल देशभरातल्या विविध ठिकाणी कारवाई करून एनआयएनं १० संशयित दहशतवाद्यांना अटक केली.. या कारवाई अनेक खतरनाक हत्यारंही जप्त करण्यात आली आहेत.


जप्त करण्यात आलेली हत्यारं

राष्ट्रीय चौकशी समिती (एनआयए) द्वारे बुधवारी दिल्ली आणि उत्तरप्रदेशच्या वेगवेगळ्या भागांतून इसिसशी संबंधित १० संदिग्ध आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून इसिसच्या नव्या मॉड्युलचाही खुलासा झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबर रोजी अयोध्या स्थित राम जन्मभूमीवर इसिसचे दहशतवादी आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत होते. या सर्व आरोपींना आज दिल्ली स्थित पटियाला हाऊस कोर्टासमोर हजर करण्यात येमार आहे.