Operation Ajay : इस्रायल-हमासमधील घमासानात भारताचे `अजय ऑपरेशन`, भारतीय नागरिक दिल्लीत परतणार
Second batch of Indian citizens Operation Ajay: इस्रायल-हमासच्या युद्धा दरम्यान भारतीय नागरिकांचा दुसरा गट आज दिल्लीत परतणार आहे.
Israel Hamas War Latest Update : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षादरम्यान 212 भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढल्यानंतर, भारतीय नागरिकांची दुसरी तुकडी शुक्रवारी संध्याकाळी राजधानी तेल अवीव येथून रवाना झाली. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि इस्रायलमधील भारतीय दूतावासाने ट्विट करून याबाबत माहिती दिली. दूतावासाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'दूतावासाने आज विशेष विमानासाठी नोंदणी केलेल्या भारतीय नागरिकांना ईमेल केला आहे. त्यानंतरच्या फ्लाइटसाठी इतर नोंदणीकृत लोकांना संदेश पाठवले जातील.
हमासने 7 ऑक्टोबर रोजी हल्ला केला
7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला होता आणि सुमारे 1 हजार लोक मारले गेले होते. यानंतर इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध घोषित केले आणि आता ते गाझा पट्टीमध्ये वेगाने हवाई हल्ले करत आहेत. त्याचबरोबर हमासही वेळोवेळी इस्रायलवर रॉकेटचा वर्षाव करत आहे. युद्ध सुरू झाल्यापासून सर्व देश आपापल्या नागरिकांना इस्रायलमधून बाहेर काढण्यात व्यस्त आहेत.
भारताने लाँच केले ऑपरेशन अजय
भारताने आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन 'अजय' सुरू केले आहे. इस्रायलमधून भारतीय नागरिकांच्या परतीसाठी या मोहिमेतील पहिले विशेष विमान शुक्रवारी सकाळी 211 प्रौढ आणि एका अर्भकाला घेऊन गुरुवारी संध्याकाळी उशिरा दिल्लीला पोहोचले. आता दुसरी तुकडी आज सकाळी दिल्लीला पोहोचणार आहे. या तुकडीत 235 भारतीय नागरिकांचा समावेश आहे.
हवाई दलाची मोठी विमानेही स्टँडबायवर
इस्रायलमध्ये सुमारे 18 हजार भारतीय राहत आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ज्या भारतीयांना परतायचे आहे त्यांनी इस्रायलमधील भारतीय दूतावासात जाऊन आपली नोंदणी करावी. अशा नागरिकांना भारतात परत आणण्याची व्यवस्था केली जाईल. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या हे ऑपरेशन चार्टर्ड विमानांद्वारे केले जात आहे, मात्र गरज भासल्यास भारतीय हवाई दलालाही या ऑपरेशनमध्ये तैनात केले जाऊ शकते. यासाठी हवाई दलाची मोठी वाहतूक विमाने स्टँडबायवर ठेवण्यात आली आहेत.