भारताच्या शंभराव्या उपग्रहाचे प्रक्षेपण
2018ची सुरूवात भारतीय अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात अत्यंत सकारत्मक झाली आहे.
मुंबई : 2018ची सुरूवात भारतीय अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात अत्यंत सकारत्मक झाली आहे.
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आज भारताचा 100वा उपग्रह ध्रुवीय कक्षेत सोडलाय. सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी आंध्रप्रदेशातल्या श्रीहरीकोट्यातील सतीश धवन स्पेस सेंटरमधून पीएसएलव्ही सी 40 या उपग्रह प्रक्षेपण यानानं यशस्वी उड्डाण केलं.
कोर्टोसॅट 2 सिरीजच्या 31 पैकी 30 उपग्रह अवकाशात साडे पाचशे किलोमीटर उंचीवरच्या कक्षेत तर उरलेला भारताचा शंभरावा उपग्रह सुमारे साडेतीनशे किलोमीटरवर प्रस्थापित करण्यात येणार आहे. कॅनडा, फिनलंड, फ्रान्स, कोरिया,ब्रिटन आणि अमेरिकाच्या उपग्रहांसह भारताचा मायक्रो एक नॅनो उपग्रह सोडण्यात आलाय.
31 उपग्रहांचं एकूण वजन 1 हजार 323 किलो आहे.