ISRO Aditya L1 launch: इस्रोची सूर्याकडे `मारुती उडी`, आदित्य L-1 चं काऊटडाऊन सुरू, एस. सोमनाथ म्हणाले...
ISRO Aditya L1 Mission Launch: आम्ही लॉन्चिंगची तयारी करत आहोत, रॉकेट आणि सॅटेलाईट तयार आहे. आमची रिहर्सल पूर्ण झालीय, अशी माहिती ISRO प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली आहे.
ISRO Aditya L1 Mission Launch: चांद्रयान 3 च्या यशानंतर इस्रोनं आता सूर्याच्या दिशेनं पाऊल (Aditya L1 mission) टाकणार आहे. इस्रोच्या आदित्य L-1चं काऊटडाऊन सुरू झालंय. 2 सप्टेंबरला सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आदित्य L-1 सूर्याच्या दिशेनं झेपावेल. ही मोहीम भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण मानली जातेय. चांद्रायान-3 च्या अभूतपूर्व यशानंतर इस्रोचे वैज्ञानिक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहेत. सूर्याचं मिशनं काऊटडाऊन सुरू झालंय. आता तो क्षण दूर नाही ISRO मार्फत PSLV-XL रॉकेटद्वारे आदित्य L-1 लॉन्च केलं जाईल. लॉन्चिंगसाठी इस्रोनं सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे.
चांद्रयान-3 च्या यशाने उत्साहित झालेल्या लोकांच्या मनात सूर्यानाशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सन मिशन आदित्य एल-1 चा उद्देश काय आहे?
ही सूर्य मोहीम यशस्वी झाल्यास काय फायदा होईल? आदित्य एल-1 चा भारतावर काय परिणाम होईल. भारतीय शास्त्रज्ञ या सर्व प्रश्नांची उत्तरे एकामागून एक लोकांना देण्याचा प्रयत्न करत आहेत. आदित्य L-1 देखील चांद्रयान-3 प्रमाणे यश मिळवेल असा पूर्ण विश्वास व्यक्त करत आहेत.
आम्ही लॉन्चिंगची तयारी करत आहोत, रॉकेट आणि सॅटेलाईट तयार आहे. आमची रिहर्सल पूर्ण झालीय, अशी माहिती ISRO प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी सूर्याच्या रहस्याचं गूढ उकलण्यासाठी आदित्य L-1 सूर्याच्या देशनं रवाना होईल.
कुठे पाहणार लाईव्ह?
इस्त्रोच्या आणखी एका ऐतिहासिक कामगिरीचा साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक भारतीय उत्सुक आहे. इस्रोच्या अधिकृत वेबसाईटवर, अधिकृत यूट्यूब चॅनल, अधिकृत फेसबुक पेज आणि एक्स हँडलवर याचं थेट प्रक्षेपण करण्यात येईल.
दरम्यान, श्रीहरिकोटा येथे असणाऱ्या अंतराळ केंद्रातून आदित्य एल1 लॉन्च करण्यात येईल. आदित्य एल वन मोहिमेतील पहिला टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे. आदित्यला पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर पडावं लागेल, हेच काम किचकट असणार आहे. आदित्य एल1 च्या वेगावर नियंत्रण ठेवता आलं नाही, तर हे यान सूर्याच्या दिशेनं जाताना वाटेतच नष्ट होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे इस्त्रोचे वैज्ञानिक यासाठी खास तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय.