Isro Chief S Somnath Stomach Cancer: इस्रो प्रमुख एस.सोमनाथ यांना पोटाचा कॅन्सर वृत्त समोर आले. जगभरातील अनेकांसाठी गंभीर समस्या बनली आहे. एस.सोमनाथ यांनी एका खासगी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पोटाच्या कॅन्सरबद्दल माहिती दिली. चांद्रयान 3 च्या लॉन्चिंगवेळीच आपली तब्येत बिघडली होती. पण सर्व टेस्ट नॉर्मल आल्या होत्या. पण मी सप्टेंबरमध्ये स्कॅनिंग केले तेव्हा आलेल्या रिपोर्टमध्ये पोटात कॅन्सर वाढत असल्याचे कळाले, असे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य माणसांना आजच्या घडली आजार अजिबात परवडत नाहीत. त्यात तो कॅन्सर असेल तर आयुष्यच उद्धस्त झाल्याची भावना त्यांच्या मनात येते. रुग्णाचे मानसिक, आर्थिक खच्चीकरण होते. त्यामुळे आपल्या निंदकालाही कधी कॅन्सर होऊ नये असे म्हटले जाते. पण पोटाचा कॅन्सर झाला असेल त्याची काही लक्षणे दिसतात. तसेच वेळीच निदर्शनास आल्यास आणि उपचार केल्यास हा कॅन्सर बरा होऊ शकतो. पण माणसाला कळणार कसं? यावर उपाय काय? याबद्दल जाणून घेऊया. 


पोटाचा कॅन्सर कसा होतो?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोटाच्या कॅन्सरसाठी हेलिकोबॅक्टर पायलोरी संक्रमण आहे. यासाठी एक जिवाणू जबाबदार असतो. यामुळे पोटात सूज (गॅस्ट्राइटिस), पेप्टिक अल्सर दिसतो. पोटाच्या कॅन्सरचे आणखी काही इतर प्रकार  असतात. हा कॅन्सर मेटास्टेसिस आहे. हे जे अंगाच्या भागात असते तेवढ्यावरच सिमित राहत नाही. शरिराच्या दुसऱ्या भागावरही पसरते. 


पोटाच्या कॅन्सरची लक्षणे 


पोटाचा कॅन्सर झालेल्या व्यक्तीला अपचन किंवा छातीत जळजळ, पोटदुखी किंवा अस्वस्थता, मळमळ आणि उलटी, अतिसार किंवा बद्धकोष्ठता, जेवणानंतर पोट फुलणे, भूक न लागणे, जेवताना घशात अन्न अडकल्यासारखे वाटणे अशी लक्षणे आढळतात. 


तुम्हाला कॅन्सर झालाय! Aditya-L1 च्या लॉन्चिंगच्या काही तास आधी ISRO प्रमुखांना कळलं, तरीही...


पोटाचा कॅन्सर कसा ओळखायचा?


Cancer.net ने दिलेल्या माहितीनुसार पोटाचा कॅन्सर झाल्यास सुरुवातीच्या टप्प्यात काही विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत.  तब्येतीत काही बदल झाला तरी तो अस्पष्ट आणि सर्वसाधारण वाटू शकतो. पण तब्येतीचे गांभीर्य ओळखून तुम्हाला तपासणी करायला हवी. तरच पोटाच्या कॅन्सरबद्दलची माहिती मिळू शकते. 


पोटाच्या कॅन्सरवर उपचार काय?


पोटाचा कॅन्सर झाला तरी व्यक्ती दीर्घायुष्य जगू शकते. कारण त्यावर उपचार करणे शक्य आहे. यामध्ये शस्त्रक्रियेद्वारे ट्यूमरला शरीरापासून वेगळे केले जाते. त्यामुळे पोटाच्या कॅन्सरचे निदान झाल्यास आत्मविश्वास गमावू नका. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.