श्रीहरिकोटा : संपूर्ण भारतीय बनावटीच्या जीसॅट-७-एचे थोड्याच वेळात प्रक्षेपण करण्यात आले. या नव्या उपग्रहामुळे भारतीय वायुसेनेची महत्वाची रडार यंत्रणा आणखी सक्षम होण्यास मदत झाली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील भारतीय अंतराळ संशोधन केंद्रातील ३९वा संदेशवहन उपग्रह जीसॅट ७ ए अवकाशात पाठवण्याची तयारी पूर्ण झाली. त्याचं काऊंट डाऊन सुरू होते. संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांनी उपग्रहाचे प्रक्षेपण झाले आहे. हा उपग्रह २२५० किलो वजनाचा असून तो भूस्थिर कक्षेत ८ वर्ष काम करणार आहे.



GSLV MK २ या रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण होणार असून २०१८ मध्ये या रॉकेटद्वारे इस्रोचे हे सातवे प्रक्षेपण असेल. जीसॅट ७ ए  हा भारतीय वायूसेनेच्या युद्ध सज्जतेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मानला जातोय. उपग्रह प्रमुख्यानं संदेश वहनासाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे शत्रूशी लढताना वायूसेनेचे संदेश वहन सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे.