ISRO Moon Mission Updates : इस्रोच्या चांद्रयान मोहिमेच्या माध्यमातून चंद्र आणि त्या अवतीभोवती असणाऱ्या अनेक संकल्पना अधिक जवळून पाहण्याची संधी सर्वांनाच मिळाली. चंद्रावर येणाऱ्या भूकंपांपासून तेथील भूमीची छायाचित्रही संपूर्ण जगानं पाहिली. अशा या चंद्राच्या भूमीवर अपेक्षेपेक्षा जास्त जलसाठी आणि बर्फ असल्याचं नुकतच एका निरीक्षणातून समोर आलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवापेक्षा उत्तर ध्रुवावर दुपटीहून जास्त water ice असल्याचं आढळलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्रोचं स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे शास्त्रज्ञ, आयआयटी कानपूरचे संशोधक, कॅलिफोर्निया विद्यापीठातील अभ्यासक आणि इतर संशोधकांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या निरीक्षणामध्ये ही बाब समोर आली. जिथं चंद्राच्या पृष्ठाच्या अंतर्गत भागात साधारण दोन मीटर अंतरापासून पाच ते 8 पट water ice असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या माध्यमातून मंगळवारी यासंदर्भातील माहिती देण्यात आली. 


चंद्राच्या पृष्ठाखाली असणारा हा बर्फ संशोधनासाठी मिळवत आता पृथ्वीपासून कैक मैल दूर असणाऱ्या या उपग्रहासंदर्भातील बरीच माहिती मिळवली जाणार आहे. प्राथमिक माहितीनुसार चंद्रावर असणारे हे water ice चे साठे तिथं झालेल्या ज्वालाममुखीय उद्रेकातून निर्माण झालेल्या वायुंमुळं तयार झाल्याचं म्हटलं जात आहे. 


हेसुद्धा वाचा : स्त्रीधनावर पतीचा किती हक्क? सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय सांगतो? 


संशोधकांनी चंद्रावरील water ice अर्थात पाण्याचे साठे शोधण्यासाठी रडार लेझर, ऑप्टीकल, न्यूट्रॉन स्पेक्ट्रोमीटर, अल्ट्रावायलेट स्पेक्ट्रोमीटर आणि थर्मल रेडिओमीटर अशा अनेक आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला. या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा वापर चंद्रावरील बर्फाळ पाणी, पाण्याचा स्तर आणि विभाजनासंदर्भातील निरीक्षण करण्यात आलं. 



चांद्रयान 2 च्या ड्युल फ्रिक्वेंसी सिंथेटिक अपर्चर रडार आणि पोलॅरीमेट्रिक रडार डेटाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार चंद्रावरील ध्रुवीय खड्ड्यांमध्ये बर्फाचं अत्सित्वं असल्याची बाब समोर आली होती. ज्यानंतर आता नव्यानं करण्यात आलेल्या निरीक्षणामुळं या माहितीला दुजोरा मिळाला. या माहितीमुळं जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांना भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी मोठी मदत मिळणार आहे.