श्रीहरिकोटा : संपूर्ण भारतीय बनावटीच्या GSAT-6A या उपग्रहाचे इस्रोने यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रावरून GSAT-6A या उपग्रहानं गुरुवारी ४.५६ वाजण्याच्या सुमारास GSLV रॉकेटमधून अवकाशात प्रक्षेपण करण्यात आले. परंतु ४८ तासांपेक्षा कमी वेळात या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. या यानाचा संपर्क तुटलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या उपग्रहामुळे लष्कर सेवेला अधिक बळकटी मिळणार आहे. मात्र, या उपग्रहाचा संपर्क तुटल्याने  शास्त्रज्ञांबरोबरच लष्करालाही मोठा फटका बसणार आहे.


GSAT-6A या उपग्रहाशी तिसऱ्या दिवशी संपर्क तुटला आहे. तसेच या GSAT-6A या उपग्रहाशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही इस्रोकडून सांगण्यात आले होते. मात्र, संपर्क होत नसल्याचे आज स्पष्ट करुन पॉवर सिस्टीम निकामी झाल्यामुळे संपर्क तुटल्याचे सांगण्यात येत आहे. तिसऱ्या कक्षेत गेल्यानंतर उपग्रहाशी संपर्क तुटल्याचे पुढे आले.


इस्रोच्या या उपग्रहामुळे लष्कराच्या सामर्थ्यात वाढ होणार होती. तसेच संपर्काचं जाळ विस्तारण्यासाठी याची मदत झाली असती. GSAT-6A या उपग्रहामध्ये सर्वात मोठी संपर्काची यंत्रणा असल्यानं त्याचा दूरसंचार क्षेत्राला फायदा होणार होता. मात्र, आता त्याचा काहीही उपयोग होणार नाही.


GSAT-6Aमुळे अतिदुर्गम भागात सेवा बजावत असलेल्या जवानांना  जवानांशी संपर्क साधणे सहज शक्य झाले असते. मात्र, दुर्दैवाने ते आता कठीण काम झालेय. GSAT-6Aच्या प्रक्षेपणासाठी वापरण्यात आलेल्या जीएसएलव्हीत शक्तिशाली क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आलाय. २०६६ किलो वजनाचा हा उपग्रह बनवण्यासाठी २७० कोटी रुपये खर्च करण्यात आला होता.