चंद्रयान 2 ची तयारी करतोय इस्रो
इस्रो लवकरच पुन्हा एक नवा रेकॉर्ड स्थापन करणार आहे. इस्रो चंद्रयान-2 च्या मदतीने चंद्रावरील रहस्य आणखी जवळून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
नवी दिल्ली : इस्रो लवकरच पुन्हा एक नवा रेकॉर्ड स्थापन करणार आहे. इस्रो चंद्रयान-2 च्या मदतीने चंद्रावरील रहस्य आणखी जवळून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
चंद्रयान 2 ची तयारी
असं पहिल्यांदा होणार आहे जेव्हा भारताचं चंद्रयान 2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवा जवळ उतरेल. या अभियानामध्ये अनेक आव्हानं देखील आहेत. मागील महिन्यातच इस्रोच्या चीफ पदावरुन रिटायर झालेले ए. एस. किरण कुमार यांनी म्हटलं की, आम्ही या अभियानासाठी दोन जागा निश्चित केल्या आहेत. ज्यापैकी कोणतीही एक जागा निश्चित केली जाईल. या भागात अजून कोणताही चंद्रयान नाही उतरलं आहे.
अभियानाची तयारी सुरु
या मिशनसाठी तमिळनाडूच्या महेंद्र गिरीमध्ये स्थित इस्रोचे लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरमध्ये तयारी सुरु आहे. यामध्ये 70-80 मीटर उंच यानाचा एक नमुना लँड करण्यात येईल.
किरण कुमार यांनी म्हटलं की, 'लॉन्चसाठी चंद्रयान-2 फ्लाईटचे हार्डवेअर तयार केले जात आहेत. हे अभियान या वर्षाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या तिमाहीमध्ये लाँच केलं जाऊ शकतं. चंद्रयान-2 ला जियोसिन्क्रोनस सॅटेलाइट लाँच वेइकल मार्क 2 रॉकेट सोबत लाँच केलं जाणार आहे.