नवी दिल्ली : केंद्र सरकारनं चंद्रयान ३ साठी परवानगी दिली असून या मोहीम सुरू आहे अशी माहिती इस्त्रोचं अध्यक्ष के. सिवन यांनी दिली आहे. त्यामुळे भारत पुन्हा एकदा चंद्रावर पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहे. '२०२० मध्ये चांद्रयान तीन ही मोहिम राबवली जाणार असून आता चंद्रावर लॅंडर आणि रोव्हर सुखरूपपणे उतरवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे अवकाश खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद यांनी मंगळवारी म्हटलं होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१९ मध्ये इस्त्रोने चांद्रयान २ ही मोहीम राबवली होती. ही मोहीम ९५ टक्के यशस्वी झाली होती. पण लँडरची संपर्क तुटल्यामुळे अनेकांचं स्वप्न तुटलं होतं. चांद्रयान २ हा चंद्राच्या भूमीवर उतरण्याचा भारताचा पहिला प्रयत्न होता. पण चंद्राच्या भूमीपासून अवघ्या २.१ किमी अंतरावर असताना लॅंडरशी संपर्क तुटला. ७ सप्टेंबरला संपूर्ण जगाचं लक्ष या घटनेकडे होतं. कारण भारताने एक नवा इतिहास रचला होता. या मोहीमेला पूर्ण यश आलं नसलं तरी देखील यावर समाधान व्यक्त केलं गेलं होतं. यावेळी संपूर्ण देश इस्त्रोच्या वैज्ञानिकांच्या पाठिशी उभा राहिला होता.


चांद्रयान-२ ही अत्यंत गुंतागुंतीची मोहीम असल्याचं तज्ज्ञ सांगतात. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगदपणे उतरण्याचा हा जगातला पहिलाच प्रयत्न होता. चांद्रयान ३ मध्ये ज्या तांत्रिक गोष्टी कमी पडल्या. त्या या पुढच्या मोहीमेमध्ये पूर्ण केले जातील. चांद्रयान ३ मध्ये ऑर्बिटर नसल्यामुळे आता त्याचं वजन आणखी कमी होणार आहे. याची आणखी मदत या मोहिमेमध्ये होणार आहे.