ISROची कामगिरी, भारताचा CMS-01 उपग्रह यशस्वी प्रक्षेपित
इस्रोने (ISRO) श्रीहरीकोटा (Sriharikota) येथून अत्याधुनिक दळणवळण उपग्रह (communication satellite CMS-01) यशस्वीरित्या प्रक्षेपित केला.
श्रीहरिकोटा : इस्रोने (ISRO) श्रीहरीकोटा (Sriharikota) येथून अत्याधुनिक दळणवळण उपग्रह (communication satellite CMS-01) यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. या उपग्रहामुळे दळणवळणात मोठे काम करता येणार आहे. भारताचा CMS-01 हा दळणवळण उपग्रह अवकाशात भूस्थिर कक्षेत पाठवण्यता आला आहे. इस्रोने श्रीहरीकोटा इथून या उपग्रहाचे दुपारी ३ वाजून ४१ मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपण केले.
अत्याधुनिक दळणवळणासाठी हा उपग्रह उपयुक्त ठरणार आहे. इस्रोची श्रीहरिकोटा इथली ही ७७ वी प्रक्षेपण मोहीम होती. CMS-01 हा सुमारे एक हजार ४१० किलो वजनाचा उपग्रह २०११ ला पाठवलेल्या GSAT-12 या उपग्रहाची जागा घेणार आहे. CMS-01 या उपग्रहाचा कार्यकाल सात वर्षांचा असणार आहे. तर PSLV या प्रक्षेपकाचं हे ५२ वे उड्डाण आहे. CMS-01 हा भारताचा ४२ वा दळणवळण उपग्रह आहे.
इस्त्रोने आज नवा इतिहास रचला आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून मोबाईल इंटरनेटपासून ते टीव्हीच्या सिग्नल्सपर्यंतच्या सर्व गोष्टींच्या दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दळणवळणासाठी ही एक चांगली बाब असणार आहे.