इस्रोचा उपग्रह आज अवकाशात झेपावणार
इस्रोचा उपग्रह आज अवकाशात झेपावणार आहे. स्वदेशी मिनी जीपीएस प्रणाली `नाविक` चा आठवा आणि राखीव उपग्रह IRNSS 1H हा PSLV C 39 या प्रक्षेपकाद्वारे संध्याकाळी 6.59 मिनिटांनी अवकाशात झेपावणार आहे.
अमित जोशी, झी मीडिया, श्रीहरीकोट्टा : इस्रोचा उपग्रह आज अवकाशात झेपावणार आहे. स्वदेशी मिनी जीपीएस प्रणाली 'नाविक' चा आठवा आणि राखीव उपग्रह IRNSS 1H हा PSLV C 39 या प्रक्षेपकाद्वारे संध्याकाळी 6.59 मिनिटांनी अवकाशात झेपावणार आहे.
अमेरिकेच्या जीपीएस सेवेच्या धर्तीवर भारताने भारतीय उपखंडात अचूक दिशादर्शन करू शकणारी 7 उपग्रहांची श्रुखंला असलेली ' नाविक ' मिनी जीपीएस प्रणाली विकसित केली. यामधील पहिला उपग्रह जुलै 2013 ला तर शेवटचा सातवा उपग्रह एप्रिल 2016 मध्ये पाठवला होता.
या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच उपग्रह हा खाजगी कंपनीने विकसित केला आहे. या आधी इस्रो उपग्रह स्वतः विकसित करायची. मात्र हे उपग्रह बनवण्याचे तंत्रज्ञान पहिल्यांदाच खाजगी क्षेत्राकडे इस्रोने सोपवले आहे.
ही मोहीम यशस्वी झाली तर PSLV या प्रक्षेपकाची 40 वी यशस्वी मोहीम ठरणार आहे.