नवी दिल्ली : इस्त्रोने पहिल्यांदाच चंद्राच्या पृष्ठभागाचा थ्रीडी व्ह्यू फोटो जाहीर केला आहे. इस्त्रोने हा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा फोटो 'चांद्रयान-२'च्या टेर्रेन मॅपिंग कॅमेराने (Terrain Mapping Camera-2) लिंडबर्ग क्रेटरडवळ काढण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीएमसी-२ वरुन संपूर्ण चंद्राच्या पृष्ठभागाचे डिजिटल एलिव्हेशन मॉडेल तयार करण्यासाठी, ५ एम स्पेटियल रिजॉल्यूशन आणि स्टिरियो ट्रिपलेटमध्ये छायाचित्रे घेतली जाऊ शकत असल्याचे इस्त्रोने आपल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे. 



चंद्राचा ३डी फोटो पाहून सोशल मीडियावर ही इस्त्रोची सर्वात मोठी कामगिरी असल्याचं बोललं जात आहे. 'चांद्रयान-२'कडून आता तिसऱ्यांदा फोटो जाहीर करण्यात आला आहे. याआधी, 'चांद्रयान-२'कडून, अंतराळातून घेतलेल्या पृथ्वीचे आणि चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो पाठवण्यात आले होते.


 


'चांद्रयान-२' मिशन २२ जुलै रोजी लॉन्च करण्यात आलं होतं. आंध्र प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील श्रीहरिकोटातील सतिश धवन अंतराळ केंद्रातून त्याचं लॉन्चिंग करण्यात आलं होतं.