इस्त्रो आज लाँच करणार जीसॅट - 6 ए सॅटेलाइट
अंतरिक्ष प्रौद्योगिक क्षेत्रात आज भारत जीसॅट - 6 ए चे प्रक्षेपण होणार आहे. जीसॅट - 6 ए उच्च शक्तीचं एस बँड संचार उपग्रह आहे. प्रक्षेपण इथून जवळपास 110 किलोमीटर दूर श्रीहरिकोटाच्या अंतरिक्ष केंद्रावर प्रक्षेपण केलं जाणार आहे. इस्त्रोने गुरूवारी प्रक्षेपित होणारी मिशनची उलटी मोजणी सुरू झाली आहे. हे प्रक्षेपण 4 वाजून 56 मिनिटांनी होणार आहे.
चैन्नई : अंतरिक्ष प्रौद्योगिक क्षेत्रात आज भारत जीसॅट - 6 ए चे प्रक्षेपण होणार आहे. जीसॅट - 6 ए उच्च शक्तीचं एस बँड संचार उपग्रह आहे. प्रक्षेपण इथून जवळपास 110 किलोमीटर दूर श्रीहरिकोटाच्या अंतरिक्ष केंद्रावर प्रक्षेपण केलं जाणार आहे. इस्त्रोने गुरूवारी प्रक्षेपित होणारी मिशनची उलटी मोजणी सुरू झाली आहे. हे प्रक्षेपण 4 वाजून 56 मिनिटांनी होणार आहे.
या प्रक्षेपणातील उपग्रहाचा 12 वी झेप
श्रीहरिकोटाचे सतीश धवन अंतरिक्ष केंद्र दुसऱ्या लाँच पॅड प्रस्तावित जीएसएलवी एफ 08 चे प्रक्षेपण गुरूवारी संध्याकाळी 4 वाजून 56 मिनिटांनी होणार आहे. ही या प्रक्षेपणाची 12 वी उडी आहे. ९ मार्चला संध्याकाळी ४.३६ वाजता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो जीएसएलव्ही एमके २ या प्रक्षेपकाद्वारे जीसॅट - ६ ए हा संदेशवहन उपग्रह ३६ हजार किमी उंचीवर भूस्थीर कक्षेत धाडणार आहे.
जीसॅट - ६ ए हा उपग्रह ऑगस्ट २०१५ ला पाठवण्यात आलेल्या जीसॅट - ६ चा जुळा भाऊ आहे. २१४० किलो वजनाच्या जीसॅट -६ ए चा कार्यकाल १० वर्षांचा असून याचा वापर मुख्यतः लष्कराच्या संदेशवहनासाठी केला जाणार आहे. यासाठी उपग्रहाला एक छोटी छत्री असणार आहे जी नियोजीत कक्षेत गेल्यावर उघडेल. या विशिष्ट छत्रीमुळे देशातील कुठल्याही भागांतून लष्कराला कधीही संदेशवहन करणे शक्य होणार आहे.