तामिळनाडू :  तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा एक चित्रपट कलावंत आपलं नशीब आजमाण्याच्या तयारीत आहे. तमिळ सुपरस्टार  कमल हसनने देशात हिंदू अतिरेकी मनोवृत्ती बळावत चालल्याचं एका लेखात म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तामिळ साप्ताहिक ‘आनंदा विकटन’मध्ये लिहिलेल्या लेखात हिंदू शिबिरांमध्ये आता दहशतवाद घुसला असल्याची टीका कमल हसन यांनी केली आहे.  उजव्या विचारांच्या लोकांना आपली वाद विवादाची रणनीती निष्फऴ ठरत असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी आता हिंसाचाराचा मार्ग अवलंबल्याचा हसनचा दावा आहे.


दरम्यान भाजपचे खासदार विनय कटियार यांनी हसनच्या वक्तव्याचा समाचार घेतला. कमल हासन यांची मनोवस्था ठीक नसून, ते मानसिक दृष्टया अस्थिर झाले आहेत असे ते म्हणाले.